कोविड लसीकरणाला देशभरात सर्वत्र सुरुवात झाली आहे. मात्र तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथे अद्यापही १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण सुरू झाले नाही. त्यामुळे येथे त्वरित लसीकरण सुरू करण्यात यावे अशी मागणी होते आहे.
४४ ते ६० वयादरम्यान लसीकरनात ही लस घेणाऱ्या ना विचारणा करूनप्र थम कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे. यात शेतकऱ्यांनाही प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.सगळीकडे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू झाले असताना.कोरपना येथील केंद्रावर लस पुरवठा बाबत अन्याय का ? असा सवाल तालुक्यातील नागरिकाकडून व्यक्त होत आहे.
येथील केंद्रावर अन्य भागातील नागरिक गर्दी करत असल्याने कार्यक्षेत्रातील नागरिकांना लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्थानिकांना पहिले लस द्यावी असे नागरिकांकडून मत व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयी लसीकरण केंद्र देण्यात आली आहे. मात्र कोरपना लाच त्यात वगळण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकातून रोष व्यक्त होत आहे.

