दि. 7 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1642 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1449 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 69 हजार 388 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 52 हजार 447 झाली आहे. सध्या 15 हजार 882 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 4 हजार 847 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 30 हजार 976 नमुने निगेटीव्ह आले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत 1059 बाधितांचे मृत्यू झाले आहे.


