चंद्रपूरात बोगस डॉक्टर चे बोगस कोविड सेंटर :: एका रुग्णांकडून 1 लाख 40 हजार रुपये घेऊन उपचार : आता पर्यंत पाच रुग्णांचा केला असून गडचंदूर शहरातील एक रुग्ण दगावल्याने हा प्रकार उघड #covid-19 - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूरात बोगस डॉक्टर चे बोगस कोविड सेंटर :: एका रुग्णांकडून 1 लाख 40 हजार रुपये घेऊन उपचार : आता पर्यंत पाच रुग्णांचा केला असून गडचंदूर शहरातील एक रुग्ण दगावल्याने हा प्रकार उघड #covid-19

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :

कोरोना ची दुसरी लाट जिल्हा सह संपूर्ण देशावर आली असून खाजगी हॉस्पिटल तर कोरोना रुग्णांना लुटून राहिले असून आता काही बोगस डॉक्टर चंद्रपूर जिल्हात सक्रिय झाल्याचे चित्र चंद्रपूर जिल्हातील गडचंदूर येथील एक दगावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकाकडून समाजवादी पार्टी कडे केलेल्या तक्रारी वरून दिसून येत आहे.


गडचंदूर शहरातील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा चंद्रपूर शहरात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन च्या शोधात आला होता त्याला चंद्रपूर जिल्हा प्रशासनानी अधिकृत केलेल्या हॉस्पिटल मध्ये बेड न मिळाल्या मुळे त्यांनी ना इलाजास्थाव झोला छाप डॉक्टर च्या झोला छाप हॉस्पिटल ला ची नेमणूक काही दलाला मार्फत केली.परंतु,त्याच दिवशी त्या बोगस हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाल्यामुळे ही बाब बाहेर हवे सारखी पसरल्या नंतर झोला छाप डॉक्टर हॉस्पिटल सोडून प्रसार झाले असल्याचे समाजवादी पार्टी च्या चंद्रपूर अध्यक्ष तन्सिल पठाण यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले आहे.



चंद्रपूर शहरातील एस पी कॉलेज परिसरात एक होमीओपेथिक च्या अंतिम वर्षाचा विध्यार्थी असलेल्या दर्शन रागीट नावांच्या 30 वर्षीय युवक कोरोना ग्रस्थ रुग्णांचा उपचार करत असल्याची तक्रार समाजवादी पार्टी चे तनशील पठाण यांना प्राप्त झाली त्यानंतर त्यांनी त्या हॉस्पिटल मध्ये आपले काही कार्यकर्ते सोबत जाऊन पहिले असता त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एक कोरोना ग्रस्त रुग्ण उपचार घेताना दिसून आला.


त्यांनी बोगस डॉक्टर दर्शन रागीट यांच्या नाव समाजवादी पार्टी च्या अध्यक्ष तनशील पठाण यांना सांगितले असून त्यांनी रागीट यांच्याशी संपर्क करण्याच्या प्रयत्न केला परंतु तोव पर्यन्त डॉक्टर प्रसार झाला होता. आता मात्र प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालत बोगस डॉक्टर वर कारवाई होणे आवश्यक आहे.


Pages