आजचे राशी भविष्य १ मे २०२१ : कसा असेल शनिवार? #Daily Horoscope 1 May 2021 - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



आजचे राशी भविष्य १ मे २०२१ : कसा असेल शनिवार? #Daily Horoscope 1 May 2021

Share This
खबरकट्टा / आजचे राशी भविष्य १ मे २०२१ : कसा असेल शनिवार?

Daily Horoscope 1 May 2021 Rashi Bhavishya, आजचे राशी भविष्य १ मे २०२१: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?


♈️मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून चांगले आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. शुभ रंग - पांढरा.


♉️वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: सरकारी कामात लवकरच यश मिळेल. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. नवीन कामाची सुरूवात करू शकता. आरोग्य निरोगी राहील. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात पदोन्नती होईल. शुभ रंग - हिरवा.


♊️मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: नवीन कार्याची सुरुवात करताना काळजी घ्या. विघ्न येण्याची शक्यता आहे. कामा-धंद्यात यश मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या. विरोधकांशी वाद-विवाद घालू नका. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. शुभ रंग - निळा.


♋️कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: मनात नकारात्मक विचार येतील. मन शांत ठेवा. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. श्री गणेशाची आराधना करा. कुटुंबात वादग्रस्त वातावरण राहण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पिवळा.


♌️सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवासा निमित्त बाहेर जाताना काळजी घ्या. कुटुंबातील आर्थिक व्यवहारामुळे मनात अस्वस्थता निर्माण होईल. सामाजिक जीवनात यश मिळेल. व्यापारात व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. शुभ रंग - लाल.


♍️कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: व्यापारी आणि विरोधकांशी स्पर्धा करू नका. कोणत्याही कामात यश मिळेल. आजारी व्यक्तींच्या तब्बेतीत सुधारणा होईल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. सासरवाडीतून चांगली बातमी मिळेल. शुभ रंग - निळा.


♎️तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे कल्पनाशक्ती वाढण्याची शक्यता आहे. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग - हिरवा.


♏️वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: मन अस्वस्थ राहील. अनिद्रामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद करू नका. वायफळ खर्च करणं टाळा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. शुभ रंग - पांढरा.


♐️धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस शुभ आहे. नवीन कामाची सुरूवात करू शकता. आरोग्य निरोगी राहील. मन स्थिर राहील. प्रवास सुखाचा होईल. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे अनुकूल वातावरण राहील. कामा-धंद्यात प्रगती होईल. शुभ रंग - निळा.


♑️मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: कुटुंबात तणावाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. मनात शंका निर्माण होतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होणार नाही. शुभ रंग - पांढरा.


♒️कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. बाहेर फिरायला जाऊ शकता. सकारात्मक विचारांमुळे मनात आध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल. दाम्पत्यांमध्ये सुखाचे वातावरण असेल. धनलाभ होईल. उत्तम आहारामुळे शरीरात स्फूर्ती राहील. शुभ रंग - नारंगी.


♓️मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: श्री गणेशाची पूजा करा. मनात एकाग्रता ठेवावी लागेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. पैशांचा खर्च वाढेल. इतरांशी आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. शुभ रंग - लाल.

Pages