यवतमाळ जिल्ह्यातील पंचायत समिती झरी येथील मोठं गाव असलेलं अडेगाव कोरोनाच्या विळख्यात सापडत चालले आहे गावातील अनेक लोकांना सर्दी ,ताप,खोकला कोरोनाचे लक्षण आहेत पण हे रुग्ण कोरोना चाचणी करण्या करीता घाबरत आहे दि 29/4/2020 ला तब्बल 11 रुग्ण एकाच दिवशी पोसिटीव्ह आढल्याने प्रशासन खडबडून जागे झाले,दक्षता समिती सुद्धा ऍक्टिव्ह करण्यात तहसीलदार यांनी आदेश दिले
गावातील अनेक लोकांना लागन झाल्याची येथील प्राथमिक अंदाज आहे.कोरोना झपाट्याने वाढत असताना झरीतील आरोग्य विभाची चमू दि 1 मे ला कोरोना चाचन्या करण्या करिता दाखल होत आहे तसेच प्रशासन सुद्धा पोसिटीव्ह आलेल्या रुग्ण सोबत संपर्क आलेल्या लोकांच्या आज चाचण्या करून कोरोना साखळी तोडण्या करिता प्रयत्न करत आहे


