वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एक महिला ठार :- ब्रम्हपूरी तालुक्यातील चिचगाव येथील दुसरी घटना.... :- तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील नागरिकांत भितीचे वातावरण.... :- सध्या रब्बी हंगामाचे पिक शेतात आहेत व वाघाचा धुमाकूळ सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रंचड भीती... :- वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी#wildattack - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एक महिला ठार :- ब्रम्हपूरी तालुक्यातील चिचगाव येथील दुसरी घटना.... :- तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील नागरिकांत भितीचे वातावरण.... :- सध्या रब्बी हंगामाचे पिक शेतात आहेत व वाघाचा धुमाकूळ सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रंचड भीती... :- वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी#wildattack

Share This
खबरकट्टा / ब्रम्हपूरी:- 


ब्रम्हपूरी तालुक्यातील दक्षिण परिक्षेत्रातील जंगलव्याप्त भागातील चिचगाव गावातील एका महिलेला गावालगत दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले.ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

ब्रम्हपूरी तालुक्यातील नेहमीच वन्यजीव प्राणी व मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. तीन दिवसांपूर्वी एका महिलेला ठार केले.आज पुन्हा एका महिलेचा बळी गेला.जंगलव्याप्त भागातील नागरिकांनी यापुर्वी अनेक आंदोलनं करण्यात आले.पण वनविभाग ने अजुनही कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.

आज ठार झालेल्या महिलेचे नाव सायत्रा श्रीराम ठेंगरी वय ६०असे असुन नेहमी प्रमाणे सायंकाळी चुल पेटविण्यासाठी काड्या घरामागे गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला व नरडीचा घोट घेऊन जागीच ठार केले.व काही अंतरावर नेले सदर घटने मुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण व वनविभागा प्रती रोष निर्माण झाले आहे.सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.बातमी लिहेपर्यंत घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी पोहोचले नव्हते..

Pages