ऑनलाईन फसवणूक : युवकाची आत्महत्या : ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा #yavatmal - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ऑनलाईन फसवणूक : युवकाची आत्महत्या : ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा #yavatmal

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : 


सध्या जिल्ह्यात तरूणांचा आत्महत्याचा सत्र सुरू असून महागांव येथील दोन युवकांची आत्महत्या केल्याची शाई वाळत नाही,तर पुन्हा यवतमाळ तालुक्यातील पिंपरी ईजारा येथील एका युवकांची फसवणूक झाल्याने आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे.

यवतमाळ तालुक्यातील पिंपरी ईजारा या गावातील मृतक चेतन विठ्ठल राठोड वय वर्षे ( २३) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार एका ऑनलाईन क्लब फैक्ट्री नावाच्या कंपनी मध्ये वारंवार २६००० रुपये गुंतवणुक करून सात लाख रुपये रक्कमेचा लकी ड्रॉ मिळणार होते म्हणुन मृतक ने कोणालाही न सांगता गुंतवणूक केली.

मात्र पैसे न मिळाल्यामुळे कंपनी ने पुन्हा मृतक युवकाला संपर्क करने बंद केल्याने आता आपली भरलेल्या रक्कमेची फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने तणावाखाली येऊन मृतकने दि.१९ नोव्हेंबर रोज गुरुवारी घरून कुणालाही न सांगता निघून गेला. 


कुटुंबीयांना घरी मृतक चेतन आढळून न आल्याने कुटुंबियांनी व गावकर्‍यांनी दिवसभर गावातील शिवारात तपास घेतल्यावर गावाजवळील जंगलातील अंगात असलेल्या स्वेटर च्या लेसनी झाडाला गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. 

Pages