कागदाच्या लगद्यापासून आकर्षक भांड्यांची निर्मिती -घाटंजी ‘नवोदय’च्या अश्विनचा अनोखा प्रयोग #yavatmal - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



कागदाच्या लगद्यापासून आकर्षक भांड्यांची निर्मिती -घाटंजी ‘नवोदय’च्या अश्विनचा अनोखा प्रयोग #yavatmal

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : 


घाटंजीजवळ बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी अश्विन राजू बाजारे याने कागद्याच्या लगद्यापासून आकर्षक भांड्यांची निर्मिती केली आहे. 


यावर्षी कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आपली कल्पकता सादर करण्यासाठी संधी मिळत आहे. त्यातूनच जगासमोर काहीतरी वेगळे करून दाखविण्याचा प्रयत्न अश्विन बाजारे याने केला असल्याचा प्रत्यय येत आहे.


त्याने हुबेहूब स्वयंपाकघरातील भांड्यांप्रमाणे दिसणारे गंज, वाटी, टोपले व दिवा कागादाच्या लगद्यापासून तयार केला आहे. चित्रकलेचे शिक्षक गिरीश निंबाळकर यांनी हा उपक्रम घरी करण्यासाठी सांगितला होता. 


त्यानुसार अश्विनने कागदाच्या लगद्यापासून हुबेहूब भांड्याप्रमाणे दिसणारे कटोरे व टोपली तयार केली.याकरिता चिक्की, पेपरची रद्दी व कणीक टाकून त्याला मळून त्याच्या तयार झालेल्या लगद्यापासून या टणक वस्तू तयार केल्याचे त्याने सांगितले. यापूर्वीसुद्धा अश्विन बाजारेने टाकाऊ वस्तूंपासून विविध कलाकृती तयार केल्या आहेत. त्याच्या या कल्पकतेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Pages