Scheduled Tribes : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपूराव्याला यश, चंद्रपूरात सुरु होणार अनुसुचित जमातीचे जात पडताळणी केंद्र राज्य सरकारने दिली मंजूरी, गैरसोय टळणार - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



Scheduled Tribes : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपूराव्याला यश, चंद्रपूरात सुरु होणार अनुसुचित जमातीचे जात पडताळणी केंद्र राज्य सरकारने दिली मंजूरी, गैरसोय टळणार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


अखेर आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपूराव्याला यश आले असून अनूसूचित जमातीचे जात पडताळणी केंद्र चंद्रपूरात मंजूर करण्यात आले आहे. तसा आदेशही सरकारच्या वतीने पारीत करण्यात आला आहे. सदर मागणी संदर्भात आ. जोरगेवार यांनी आदिवासी मंत्री के. सी पाडवी यांच्यासह संबधित विभागाशी पत्रव्यवहार करत लावूली धरली होती.


चंद्रपूर जिल्हात अनुसुचित जमातीच्या नागरिकांचे मोठ्या संख्येत वास्तव्य आहे. मात्र येथे जात पडताळणी केंद्र नसल्याने येथील अनुसुचित जमातीच्या नागरिकांना गडचिरोली येथे जावे लागत होते. 

त्यामूळे हे प्रमाणपत्र काढणे नागरिकांना त्रासदायक झाले होते. विशेष म्हणजे सदर कार्यालय उपलब्ध करुन देण्याबाबत 2019 ला आदेशही पारीत करण्यात आला होता. मात्र त्याची पुतर्ता होत नव्हती. विदयार्थी, शिक्षक, शासकीय नौकरदार, नागरिक, व निवडणूक लढविणारे उमेदवार यांची गैरसोय लक्षात घेता सदर जात पडताळणी केंद्र चंद्रपूरात सुरु करण्यात यावे हा विषय आ. किशोर जोरगेवार यांनी चांगलाच लावून धरला होता. 


या संदर्भात आ. जोरगेवार यांनी आदिवासी मंत्री के. सी पाडवी, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह संबधित विभागाशी पत्रव्यहार केला होता. आ. जोरगेवार यांच्याकडून या मागणी संदर्भात वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठवूरावा सुरु होता. 


अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासनातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानूसार अनूसूचित जमातीचे जात पडताडणी केंद्र चंद्रपूरात सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. याचा मोठा फायदा येथील नागरिकांना होणार आहे.

Pages