राजुरा - सास्ती रस्ता दुरुस्ती कामाची चौकशी करण्याची मागणी. राजुरा शहर युवक काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन.#rajura - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राजुरा - सास्ती रस्ता दुरुस्ती कामाची चौकशी करण्याची मागणी. राजुरा शहर युवक काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन.#rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा (ता.प्र) :-


राजुरा तालुक्यातील राजुरा - सास्ती रस्त्यावर काही दिवसापूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र खराब दर्जामुळे डागडुजी करण्यात आलेले ठिकाणी पुन्हा खडे पडलेले आहेत तसेच गीट्टी उखडले आहेत. 


या खराब कामाची चौकशी करण्यात यावी. तसेच जबाबदार असणाऱ्या ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजुरा शहर युवक काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी, बांधकाम विभाग राजुरा तसेच तहसीलदार राजुरा यांच्याकडे करण्यात आली. 


या प्रसंगी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशोक राजु राव, सोनिया नगर वॉर्ड अध्यक्ष निरंजन मंडळ, श्रीकांत चित्तरवार, आकाश यादव, सलीम शेख, सूरज थुल, गांपावर कार्यकर्ते उपस्थित होते.

Pages