ब्रम्हपूरी शहर हे शिक्षणनगरी व आरोग्य नगरी म्हणून ओळखले जाते.पण दारू बंदी झाल्यापासून शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
पोलिस प्रशासन अनेक कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांनी येथील पदभार सांभाळला पण कोणताही अधिकारी अवैध धंदे पुर्णपणे बंद करू शकले.पण नुकतेच रूजू झालेले पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या समोर मोठे आव्हान आहे.ते कोणत्या पध्दतीने पेलवतात हे येत्या काही दिवसांत च कळेल.
आज मुखबीर यांच्या माहिती वरून कहाली हत्तीगोठा ब्रम्हपूरी येथे नाकाबंदी करून मारुतीMH-31 -CM1355 कार येत असताना तिला थांबवून झडती घेतली असता देशी दारूच्या ६७२ बाटल्या किमंत १३४४००रूपये व मारोती कार अंदाजे किंमत ५०००० रुपये असा एकूण माल १८४४००रुपयांचा अवैध सह मुद्देमाल जप्त करण्यात आले.
आरोपी देवेंद्र रंगारी वय ३४ यांच्या वर गुन्हा नोंद करण्यात आली आहे.सदर कारवाई पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक अश्र्विन खेडीकर, पोलिस शिपाई अनुप, पोलिस शिपाई दयाराम यांनी केले.