खबरकट्टा/चंद्रपूर:
छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सहा आरोपी या प्रकरणात दोषी ठरले आहेत. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिलाय. या निकालानंतर 18 जुलै रोजी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. कलम 120 ब आणि 420 अंतर्गत ते दोषीD ठरले आहेत. माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता, के एस क्रोफा, के.सी. सामरिया तसेच जेलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज जयस्वाल यांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे.#khabarkatta chandrapur
सीबीआयला या प्रकरणात पुरावे सादर करण्यात यश आल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने नोव्हेंबर 2014 मध्ये सादर झालेला क्लोझर रिपोर्ट फेटाळून लावला होता व या प्रकरणात आणखी तपास करण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते. तत्कालीन खासदार दर्डा यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठविलेल्या पत्रात विपर्यस्त माहिती मांडल्याचा ठपका त्यांच्यावर होता. त्यावेळी कोळसा मंत्रालयाची जबाबदारी मनमोहनसिंग यांच्याकडेच होती. जेलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडसाठी छत्तीसगडमधील फतेहपूर कोळसा ब्लॉक मिळविण्यासाठी हा खटाटोप केल्याचे न्यायालयाने नमूद केले.#khabarkatta chandrapur