खबरकट्टा/चंद्रपूर:
सन 1980 मध्ये सुरू झालेल्या संजय गांधी निराधार योजनेत निराधार,वृध्द व्यक्ती,अंध,अपंग,शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती,विधवा,अत्याचारित महिला,घटस्फोटीत महिला,अनाथ मुले,तृतीयपंथी व परितक्ता यांना अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने ही योजना त्यावेळेस असलेल्या काँग्रेस सरकारने सुरू केली होती.#khabarkatta chandrapur
परंतु मागील दोन महिन्यांपासून या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत.त्यामुळे या निराधार लोकांवर आता उपासमारीची पाळी आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या हजारो लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे त्वरीत जमा करण्यात यावे अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांनी केली आहे.#khabarkatta chandrapur