खबरकट्टा/चंद्रपूर :
डोमिसाईल प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र,अल्पभूधारक दाखला, रहिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, Affidavit, महिला आरक्षण प्रमाणपत्र,
ई. विविध प्रकारचे दाखले निर्गमित करण्यासाठी सेवा हमी कायद्यानुसार 15 ते 21 दिवसांचा कालावधी शासनाकडून विहित करण्यात आला आहे.
परंतु चंद्रपूर तहसील कार्यालय मार्फत अर्ज केल्यापासून केवळ एकाच दिवसामध्ये दाखले निर्गमित करण्यात येणार असल्याचे चंद्रपूरचे तहसिलदार जितेन्द्र गादेवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे. आज पासून हा उप सुरु होत असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले.#khabarkatta chandrapur
हे एक गतिमान व लोकाभिमुख प्रशासनाचे एक महत्त्वाचे पाऊल आहे.विविध दाखले अभावी एखाद्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, लाभार्थ्याचा एखाद्या शासकीय योजनेचा लाभ, महाविद्यालयीन प्रवेश, नोकरीतील नियुक्ती, इत्यादी कोणतेही काम अडू नये याकरिता हा संकल्प आम्ही सोडला आहे.
चंद्रपूर तालुक्यातील चंद्रपूर शहर सह 102 गावात मिळून अंदाजे सात लाख लोकसंख्या असून दाखल्यांसाठी रोज सुमारे 500 अर्ज प्राप्त होतात, म्हणजे या माध्यमातून दररोज पाचशे लोकांचा तहसिल कार्यालयाच्या माध्यमातून महसूल प्रशासनाशी संपर्क येतो,या सर्वांचे काम तात्काळ व त्वरित झाल्यास महसूल प्रशासनाबद्दल जनमानसामध्ये सकारात्मक प्रतिमा निर्माण होईल.अर्जंट प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता वशिला किंवा दलालाची गरज पडणार नाही. हे येथे उल्लेखनीय आहे.#khabarkatta chandrapur