महाराष्ट्रतुन एकमेव नर्सिंग अध्यापिक पुष्पा पोडे(पाचभाई) ठरल्या 2023 राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ अवॉर्ड च्या मानकरी - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



महाराष्ट्रतुन एकमेव नर्सिंग अध्यापिक पुष्पा पोडे(पाचभाई) ठरल्या 2023 राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ अवॉर्ड च्या मानकरी

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे (पाचभाई) यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायट्रिकल अवॉर्ड हा जाहीर झालेला असून पुष्पा पोडे या मागील 2001 पासून नर्सिंग क्षेत्रात विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात आहे पोडे यांनी 2001 मध्ये ग्रामीण रुग्णालय अहेरी इथून आपल्या कार्याची सेवा सुरू केली.#khabarkatta chandrapur 

गडचिरोली जिल्ह्यासारख्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी अवरित पाच वर्षे सेवा करत रुग्णांची सेवा केली चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे त्यांची बदली झाल्यानंतर बावीस वर्ष त्यांनी रुग्णसेवा केलेली असून कोरोना सारख्या आपत्ती काळात त्यांनी आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करून कोरोनाशी लढण्यासाठी तयार केला आणि स्वतःही कोरोना सारख्या आपत्ती काळात त्यांनी स्वतःला अविरत झोकून देऊन रुग्णांची सेवा करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत त्यांना अनेक जिल्यातील पुरस्काराने सुद्धा सम्मानीत केलं असून त्यांना नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया यांनी पोडे यांची निवड राष्ट्रीय फ्लोरेन्स नायट्रिकल अवॉर्ड नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी करण्यात आली.#khabarkatta chandrapur 

त्यांना दिनांक 22 जून रोजी मा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय फ्लोरेन्स नायट्रिकल अवॉर्ड वितरित करण्यात येणार आहे या संपूर्ण यशाचे श्रेय त्यांनी त्यांचे वरिष्ठ त्यांचे सहकारी त्यांचा परिवार यांना दिलेला असून पुढेही त्यांनी अविरत कार्य कराचे निश्चय केला आहे हा पुरस्कार पुष्पा पोडे पाचभाई यांनाच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी समर्पित केला आहे.


Pages