हंसराज अहिर यांची डॉ. झाडे विरुद्ध तक्रार : भावाच्या मृत्यूस जबाबदार धरत sp कडे केली गुन्हा नोंदविण्याची मागणी - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



हंसराज अहिर यांची डॉ. झाडे विरुद्ध तक्रार : भावाच्या मृत्यूस जबाबदार धरत sp कडे केली गुन्हा नोंदविण्याची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

माजी केंद्रीय राज्यमंत्री (राज्य) आणि सध्या ओबीसी मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांनी त्यांचे धाकटे भाऊ हितेंद्र अहिर यांच्या मृत्यूसाठी डॉ. विश्वास झाडे यांना जबाबदार धरले आहे. त्याचबरोबर डॉ.झाडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.स्थानिक जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) यांच्याकडे गुन्हा नोंद करण्याची मागणी केल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर यांचे धाकटे भाऊ हितेंद्र अहिर यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना तातडीने डॉ.विश्वास झाडे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला तब्बल एक महिन्यानंतर हंसराज अहिर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करताना आपल्या भावाच्या मृत्यूस डॉक्टर विश्वास झाडे जबाबदार असल्याचे सांगत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.

भाजप नेते हंसराज अहीर यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉ.विश्वास झाडे यांच्या रुग्णालयात पोहोचून त्यांची चौकशी केली. त्यावरूनही समाधान न झाल्याने पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून जबाब नोंदवला.
या प्रकरणात आपले स्पष्टीकरण देताना डॉ. झाडे म्हणाले की, "हितेंद्र अहिर यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयात पोहोचल्यानंतर पाच मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. यात माझी कोणतीही चूक नाही. मात्र, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. हंसराज अहिर यांच्या फिर्यादीवरून डॉ.झाडे यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. हे प्रकरण आता पेटण्याची शक्यता आहे.
उल्लेखनीय आहे की, डॉ.विश्वास झाडे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. डॉ.झाडे यांच्यावरील हा आरोप येत्या काळात राजकारणाच्या कुरुक्षेत्रात कोणते वळण घेणार हे सध्या तरी ठरवणे कठीण आहे.

Pages