वनपरिक्षेत्रातील नर बिबट्याचा मृत्यू ,शविच्छेदनानंतर केले दहन - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



वनपरिक्षेत्रातील नर बिबट्याचा मृत्यू ,शविच्छेदनानंतर केले दहन

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

आज दि. 21.02.2023 रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र तांबेगडी मेंढा, नियतक्षेत्र मरेगांव मधिल का कत्र 276 RF मध्ये बिबट मृत अवस्थेत आढळुन आले असल्याची माहीती अधिनिस्त वनकर्मचारी यांचे कडून भ्रमणध्वनी व्दारे प्राप्त झाली. त्यानुसार श्री. व्हि. ए. सालकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) सिंदेवाही हे अधिनिस्त वनकर्मचारी यांना घेवून मोकास्थळी पोहचले. घटनेची पाहणी केली असता, घटनास्थळावर 1 बिबट (नर) वय अंदाजे 3 ते 4 वर्ष मृत अवस्थेत पडून असल्याचे आढळले. सदर घटनेची माहीती वरिष्ठ अधिकारी यांना भ्रमणध्वनी व्दारे कळविण्यात आली. 

त्यानंतर घटनास्थळावर मा. श्री. एम. वि. चोपडे, सहायक वनसंरक्षक (प्रादे व वन्यजीव) ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी, श्री. विवेक करंबेकर, मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी वनविभाग व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी श्री. यश कायरकर, NGO प्रतिनिधी (रवॉब नेचर केअर फाउन्डेशन), डॉ. विनोद सुरपान, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, सिंदेवाही, डॉ. शालिनी लोंढे, पशुधन विकास अधिकारी, सिंदेवाही हे हजर झाले. त्यांनी मृत बिबटचे निरिक्षण केले. सदर बिष्ट्याचे सर्व अवयव शाबुत असल्याची खात्री केली. तसेच मृत बिबट व मोक्यावरील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर सदर बिबटचे मृत्यू झुजीत झाले असावे, असा प्राथमीक अंदाज पशुचिकीत्सक यांनी वर्तवीला. मौकास्थळाची चौकशी करून हे प्रकरण शिकारीचे नाही याची खात्री वरेल सर्व उपस्थित अधिकारी यांनी केल्यानंतर उपस्थित अधिका-याच्या समक्ष गौका पंचनामा करण्यात आला.
वरिष्ठांच्या आदेशान्वये मध्यवर्ती काष्ट भांडार, सिंदेवाही येथे सकाळी 10.00 वाजता पासुन डॉ. विनोद सुरगाम व डॉ. शालिनी लोंढे यांनी सदर मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून उत्तरिय तपासणी करीता पुढील प्रमाणे नर बिबटचे नमुने (विसेरा) घेण्यात आले. सदर बिबटचे (नर) शवविच्छेदन झालेनंतर मा. पन अधिकारी व उपस्थित सर्व अधिकारी व पंचाच्या उपस्थितीत सदर बिबटचे (नर) दहन करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.

सदर नमुने उत्तरिय तपासणी करीता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असुन उत्तरिय तपासणीचा अहवाल आल्यानंतर व पशुवैद्यकीय अधिकारी यांचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेनंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

Pages