खबरकट्टा/चंद्रपूर:
विविध बँकाकडून जनतेच्या सोईसाठी उपलब्ध होणारे ATM कार्ड द्वारे फसवणूक करून त्यांच्या कष्टाचे पैसे दुसऱ्या ATM मशीनमधून काढून लुबाडणूक करणारी हरीयाणा राज्याची टोळी ब्रम्हपुरी पोलीसांच्या हाती लागून एका रॅकेट उघड झाले आहे.
दि. 25/11/2022 रोजी ब्रम्हपुरी येथील SBI बँकेच्या ATM मध्ये पैसे काढण्यास गेलेले माजी सैनीक नामे वामन गोसाई दिधोरे रा. किन्ही ता. ब्रम्हपुरी याना अज्ञात आरोपीने पैसे काढण्यात मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे ATM कार्ड बदलुन दुसरे कार्ड दिले. त्याना त्यावेळी सदर फसवणुक लक्षात आली नाही. 3 दिवसांनी परत ATM मध्ये जावुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा माहीत झाले की, आपली फसवणुक झाली आहे. त्यांनी बँकेत जावुन स्टेटमेंट काढले असता 10000 रु वडसा येथील ATM मधुन विड्रॉल झाल्याचे समजले तसेच 74,997 रुपये ऑनलाईन ट्राइझेक्शन झालेले दिसले असे एकुण 84.997 रुपये ची फसवणुक झालेली असल्याने त्यांनी पोलीस स्टेशन बम्हपुरी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध नकार दिल्याने अप.क. 587/2022 कलम 420 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हयाचे गुन्हयाचे तपासादरम्यान सीसीटिकी फुटेज व विविध तारिक पुराव्याच्या आधारे यातील आरोपी है मौजा हसी जि. हिसार राज्य हरियाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले असून ते वापरत असलेले वाहन हरीयाणा पालॉग आहे याची खात्री पटली. त्याआधारे आरोपीचा शोध सुरु झाला. सदर ठिकाणी दि. 07/11/2022 ला पथक पाठविले असता आरोपी हे त्या ठिकाणावरन पसार झाले होते.
दि. 11/02/2023 रोजी सायंकाळी ब्रम्हपूरी पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली कि. गुन्हयातील आरोपी हे आदिलाबाद कडे अश्याप्रकारचा गुन्हा करण्यासाठी निघाले असल्याने तात्काळ पोलीस पथक गठीत अन्य वेळगावा कडे रवाना केले पथकाला पन्हा माहिती मिळाली की. आरोपी हेटाटा नेक्सान कार क. एच आर 21 पी 0125 ने आदिलाबाद करुन नागपुर कडे जात आहे. तेव्हा पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करीत असताना आरोपी हे चारचाकी वाहनाने समोर असल्याने पोस्टे बुटीबोरी नागपुर ग्रामीण पोलीसांना कळवून त्याचे सहकार्याने कार थांबवुन कारमधुन तीन इसमास ताब्यात घेण्यात आले.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे 1) जोगीदरसिंह चंदरसिंह बिटट्टु वय 26 वर्ष रा. पुठठी सामानता.नारनोद जि. हिसार राज्य हरीयाणा 2) राजेश रेलुराम माला वय 45 वर्ष रा. हंसी जि. हिसार राज्य हरीयाणा ३)पुनीत शिवदत्त पांचाल, वय 32 वर्ष रा. बुबाबा वस्ती जिंद ता. जि. जिंद राज्य हरीयाणा यांच्या ताब्यातुन 72 ATM कार्ड, 43000 रु. रोख रक्कम, तीन मोबाईल, गुन्हा करण्याकरीता वापरण्यात आलेली Tata nexon car no. HR-21. P-0125 वाहन जप्त करण्यात आले. सदर आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आलेले ATM कार्ड हे विविध राज्यातील व्यक्तीचे असल्याने आरोपी हे राजस्थान, गुजरात, तेलगांना, मध्यप्रदेश, महाराष्ट्र अशा विविध राज्यामध्ये ए टी एम ची अदलाबदल करुन नागरिकांची आहेत. फसवणुक करीत असल्याचा दाट संशय आहे. सदर आरोपी सध्या पोलीसांच्या अटकेत
सदरची कार्यवाही मा. रविंद्रसिंह परदेशी सा., पोलीस अधिक्षक चंद्रपुर व मा. श्रीमती रिना जनबंधु मॅडम, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांच्या सुचनेप्रमाणे श्री. मिलींद शिंदे, उपविभागीय पोलीस | अधिकारी ब्रम्हपूरी व पो. नि. रोशन यादव सौ. पो स्टे ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत ठवरे, नापो / 2552 मुकेश गजबे, नितीन भगत / 2379, योगेश शिवणकर / 1734, पोशी/ 2332 संदेश देवगडे, विजय मैद/ 163, अजय कटाईल 2522,यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पूढील तपास सपोनी प्रशांत ठवरे करीत नागरीकाना आवाहन करण्यात येते कि, आपल्यासोबत अशा प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. सदर घटना आपल्यासोबत झालेली असल्यास पो. स्टे. ब्रम्हपूरी येथे संपर्क साधावे.