खबरकट्टा/चंद्रपूर :
महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या (सीएसटीपीएस) दुरुस्ती व देखभाल अवस्थेत असलेल्या 500 मेगावॉटच्या संच क्रमांक 5 मधील कोल मीलमध्ये काम करीत असताना 22 मीटर उंचीवरून खाली कोसळल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. सचिन गोवर्धन रा. दुर्गापूर असे मृत कामगाराचे नाव आहे.
सचिन गोवर्धन हा महाऔष्णिक विद्युत केंद्रात पेटी कंत्राटदारामार्फत काम करीत होता. रविवारी संच क्रमांक 5 हा देखभाल व दुरुस्तीसाठी बंद होता. या संचाची स्वच्छता करण्यासाठी सचिन हा कोल मीलमध्ये गेला. तो 22 मीटरवर उंचीवर जाऊन काम करीत होता. दरम्यान, अचानक तोल गेल्याने २२ मीटरवरून खाली कोसळला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्याला चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचारासाठी दाखल • करण्यात आले. मात्र, अवघ्या दीड तासातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतक सचिनच्या कुटुंबीयांना - आर्थिक मदत देण्याची मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे. या घटनेमुळे महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.