अंबादास दानवे नाराज : चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांवरून - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अंबादास दानवे नाराज : चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांवरून

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

वैद्यकीय सुविधांचा अभाव, रुग्णालयाची अपुरी जागा, औषधांची कमतरता, अस्वच्छतेचा अभाव व अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या आधी चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांवरून विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

रुग्णालयातील असुविधांमुळे तातडीने नवीन मेडिकल इमारतीत या रुग्णालयाचे स्थलांतर करण्याच्या सूचना दानवे यांनी केल्या. तसेच यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दानवे यांनी आज चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या पाहणीदरम्यान दिली.यापाहणी दरम्यान वैद्यकीय अधिक्षक यांच्या समोरच निवासी डॉक्टरांनी अंबादास दानवे यांच्यासमोर अडचणींचा पाढा वाचला.एमआरआय मशीन असून ती अजून कार्यरत नाही, ऑपरेशन विभागात मूलभूत सुविधा नाही, रेडीओलॉजी विभागात कर्मचारी नाही तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न आदी समस्या निवासी डॉक्टरांनी दानवे यांच्यासमोर मांडल्या.

केपीसीएल कंपनीकडून विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच पुर्नवसनाचा मुद्दा, चंद्रपूर जिल्हा मेडिकल महाविद्यालयातील असुविधा, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. केपीसीएल कंपनीने शेतकऱ्यांची काही जमीन वाटाघाटी करून खासगीरित्या घेतली तर काही जमीन सरकारकडून घेतली. मात्र शेतकऱ्यांची जमीन घेऊनही त्यांच्या नावांची यादी नाही असे सांगून कंपनी दुतोंडी भूमिका निभावत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दानवे यांनी केली. शेतकऱ्यांच वेळेत पुर्नवसन न केल्यास वैधानिक मार्गाने पावले उचलून येथील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असा इशारा दानवे यांनी केपीसीएल कंपनीला दिला.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा , अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख स्वप्निल काशीकर, जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, आशिष कावटवार विरोधी पक्षनेते नगरपरिषद पोंभुर्णा,सरपंच प्रशांत कोल्हे वाहनगाव युवासेना जिल्हाध्यक्ष समनव्यक विनय धोबे व पदाधिकारी उपस्थित होते.

Pages