सुरजागड खाणविरोधी आंदोलन पेटण्याची चिन्हे : आदिवासींच्या प्रखर विरोधानंतरही 6 लोहखानी सुरू होणार - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सुरजागड खाणविरोधी आंदोलन पेटण्याची चिन्हे : आदिवासींच्या प्रखर विरोधानंतरही 6 लोहखानी सुरू होणार

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर: गडचिरोली
एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू करण्यात प्रशासनाला यश आले. आता या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार असून, याच टेकडीवर पुन्हा 6 नव्या खाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे.

स्थानिक आदिवासींच्या प्रखर विरोधानंतरही एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू करण्यात प्रशासनाला यश आले. आता या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार असून, याच टेकडीवर पुन्हा ६ नव्या खाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतेच निविदा मागवण्यात आल्याने पुन्हा एकदा खाणविरोधी आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू करण्यासाठी प्रशासनाला दोन दशके वाट पाहावी लागली. सूरजागड टेकडीवर आदिवासींचे पारंपरिक ठाकूर देव, संरक्षित माडिया जमात आणि जंगल खाणीमुळे नष्ट होतील, अशी भीती येथील आदिवासींच्या मनात आहे. मात्र, दीडवर्षापूर्वी प्रशासन व कंत्राटदार कंपनीने सर्वच पर्यायांचा वापर करून हा विरोध मोडून काढला व विनाअडथळा येथील खाण सुरू केली.

वर्षभरात हजारो कोटींचे लोहखनिज बाहेर पाठवण्यात आले.त्यामुळे या भागातील उर्वरित खाणीदेखील कार्यान्वित करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

Pages