खबरकट्टा/चंद्रपूर:
मुकुटबन येथील पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेला एक पोलीस व महसुल विभागाचे तीन कर्मचारी यांनी पाच महिण्याआधी रेतीचा ट्रॅक्टर सोडविण्यासाठी तडजोडीअंती 50 हजार रुपयाची मागणी केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ( ACB) ने पडताळणी केली. व त्यांना पकडण्यासाठी वेळोवेळी सापळा रचला पण ते लाचखोर सापळत नव्हते अखेर आज दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोज गुरुवारला त्या चौघांना ताब्यात घेण्यात आले.
असुन संजय रामचंद्र खांडेकर वय 38 वर्ष, हे पोलीस नाईक म्हणुन पोलीस स्टेशन मुकूटबन येथे आहे. तर नमो सदाशिव शेंडे वय 38 वर्ष पद तलाठी साजा खातेरा, रमेशकिकीरा राणे वय 48 वर्ष पद तलाठी साजा मुकूटबन, बाबुसींग किसन राठोड वय 53 वर्ष पद मंडळ अधिकारी असे ताब्यात घेतलेल्या लोकसेवकाची नावे असुन त्या चारही लोकसेवकांनी आपले कायदेशीर कर्तव्य न बजावता आर्थिक लाभ मिळण्याकरीता लाचेची मागणी केली.
ही घटना दिनांक 23/9/2022 ची असुन त्यांचे कडून वेळोवेळी पैश्याची मागणी केली. त्यांना तडजोडीअंती 50 हजार देण्याचे ठरले पण लाचखोर रंगेहाथ सापडत नव्हते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व बाबीची परताळणी केली व लाचखोरांना रंगेहात पकडण्यासाठी अनेकवेळा सापळा रचला पण हे लाचखोर सापडत नव्हते अखेर आज ACB ने केलेल्या परताळणी व लाचेची मागणी केल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे खात्री पटल्यानंतर या चौघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
सदरची कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक एन्टी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती, अरूण सावंत अपर पोलीस अधीक्षक अमरावती, देविदास घेवारे अपर पोलीस अधीक्षक अमरावती आणि पोलीस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट आणि अंमलदार अब्दुल वसिम, सचिन भोयर, महेश वाकोडे, सुधीर कावळे, राकेश सावसाकडे व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे यांनी केली.