जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी : ऑनलाईन अर्ज आमंत्रित - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी : ऑनलाईन अर्ज आमंत्रित

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर, दि. 09 :

जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी येथे सत्र 2023-24 मध्ये इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी निवड चाचणीद्वारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 असून परीक्षा दि. 29 एप्रिल 2023 रोजी असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी navodaya.gov.in हि लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी सदर लिंकवर जाऊन अर्ज सादर करावा.

अर्ज भरतांना, उमेदवाराचा जन्म 1 मे 2011 ते 30 एप्रिल 2013 दरम्यान झालेला असावा. उमेदवार हा ज्या जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय कार्यरत आहे त्याच जिल्ह्याचा निवासी आणि इयत्ता पाचवीत शिकत असलेला असावा. म्हणजेच, पालक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने सत्र 2022-23 मध्ये इयत्ता पाचवीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

उमेदवाराचे आधारकार्ड अनिवार्य असून आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबरच ओटीपी आणि इतर माहिती पाठविण्यासाठी वापरला जाईल. ज्या उमेदवाराकडे आधारकार्ड नाही, त्यांनी नोंदणीपूर्वी आधार कार्डसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने (तहसीलदार) जारी केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील पालकांच्या रहिवासी प्रमाणपत्राच्या आधारे ते नोंदणी करू शकतात. नोंदणीच्या वेळी सदर प्रमाणपत्र पोर्टलवर अपलोड करावे. तात्पुरती निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी आधारकार्ड अनिवार्य राहील, असे जवाहर नवोदय विद्यालय तळोधीच्या प्राचार्या मीना मणी यांनी कळविले आहे.

Pages