करुणा गावंडे -जांभुळकर यांची राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कारासाठी निवड#rajura. - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



करुणा गावंडे -जांभुळकर यांची राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कारासाठी निवड#rajura.

Share This
खबरकट्टा / राजुरा 6 जानेवारी :


सुमतीबाई गोरे ट्रस्ट च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यात जि. प.उच्च प्राथमिक शाळा आर्वी, पंचायत समिती राजुरा येशील शिक्षिका करुणा गावंडे- जांभुळकर यांची निवड झाली आहे.


सदर पुरस्कार सोहळा 16 जानेवारी 2022 ला पुणे येथील उद्यान कार्यालय सदाशिव पेठ -30 येथे ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. स्वतःतील गुणवत्तावाढ , सामाजिक व शैक्षणिक कार्यातील वेगळेपणा, साहित्यिक सहभाग व विद्यार्थी विकासातील वेगळे प्रयोग व प्रयत्न या निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली.


राज्यभरातील एकूण 21 शिक्षकांची निवड समितीद्वारे करण्यात आली आहे. त्यात करुणा गावंडे - जांभुळकर यांचीही निवड झाल्याने यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Pages