चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे वरोरा तालुक्यातील शेतक-यांना मदत:#warora - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे वरोरा तालुक्यातील शेतक-यांना मदत:#warora

Share This


जिल्हा बैकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे, डॉ. विजय देवतळे, दामोदर रुयारकर, दत्ता बोरेकर आदींची उपस्थिती 

खबरकट्टा /चंद्रपूर :वरोरा 


चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर द्वारा 'शेतकरी कल्याण निधी' अंतर्गत वरोरा तालुक्यातील शेतकरी कुटुंबांना आर्थीक मदत करण्यात आली.

तालुक्यातील कोटबाळा येथील शुभांगी हेमंत ऊरकांडे यांचे पती हेमंत भास्कर उरकांडे हे विज पडून मरण पावले. भटाळा येथील मधूकर तुकाराम तूमसरे यांचे मालकीचा बैल मरण पावला. माढेळी येथील मारोती अजाबराव चौधरी यांचे मालकीचा बैल मरण पावला. नागरी उखर्डा येथील अजाब महादेव हिवरकर यांचे मालकीचा बैल मरण पावला. शेगाव (खुर्द) येथील संतोष कानोबा सालेकर यांच्या मुलीला आनुवांशीक दुर्धर आजार जडला आहे. नंदोरी येथील रत्नमाला मारोती शेंडे यांचे पती मारोती शेंडे मरण पावले. या सर्व कूटुंबांना चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.


सदर योजना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह चंदनसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेचे संचालक मंडळाद्वारा राबविण्यात येत आहे.

यावेळी जिल्हा बैकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे, डॉ. विजय देवतळे, दामोदर रुयारकर, दत्ता बोरीकर, वरो-याचे विभागीय अधिकारी विलास जोगी आदी उपस्थित होते.


बैंकेतर्फे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर यांचे कुटूंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू, वीज पडून मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, वन्यजीव प्राण्यांमुळे मृत्यू, गुरे ढोरे मृत्यू पडल्यास, गोठा जळाल्याने व शेतातील धान्य, पिक जळाल्याने होणा-या नुकसानाची भरपाई स्वरुपात देण्यात येत आहे.

यासाठी शेतकरी, शेतमजूर बंधूंना पोलीस एफआयआर, पटवारी पंचनामा जोडून संबधित शाखेत अर्ज करावा लागतो. बँकेच्या या योजनांचा लाभ शेतकरी, शेतमजुर बांधवांनी घ्यावा, असे आवाहन रवि शिंदे यांनी यावेळी केले.

Pages