चंद्रपूर ब्रेकिंग : शिवसेना जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी : मुकेश जीवतोडे ह्यांची नियुक्ती प्रभारी जिल्हाप्रमुख :शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये हे अधिकृतपणे जाहीर #shivsena - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर ब्रेकिंग : शिवसेना जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी : मुकेश जीवतोडे ह्यांची नियुक्ती प्रभारी जिल्हाप्रमुख :शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये हे अधिकृतपणे जाहीर #shivsena

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -


शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते ह्यांच्या कामगिरीवर नाखूष होऊन त्यांना या पदावरून हटविण्यात आले असून मत्ते ह्यांना ह्या डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्याजागी प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून मुकेश जीवतोडे ह्यांची नियुक्ती प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

जिल्हाप्रमुख म्हणून नितीन मत्ते ह्यांना चिमूर, वरोरा आणि ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र पक्षाला बळकट करण्यास आणि पक्षवाढीसाठी ते असमर्थ ठरले. जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची कामगिरीवर असंतोषजनक ठरली. त्यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला. तसेच याबाबत त्यांच्या अनेक तक्रारी पक्षश्रेष्ठीपर्यंत पोचल्या होत्या.

तसेच काही महिन्यांपूर्वी जुगार अड्ड्यावर झालेल्या मारहाणीचे प्रकरण चांगलेच गाजले. सात लाख रुपये हिसकावून मारहाण केल्याच्या गंभीर आरोपाखाली सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख मत्ते यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. ह्याच प्रकरणात तुरुंगाची हवा खाण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. एरव्ही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवरच गुन्हे नोंदविले जातात.

मात्र, मत्ते यांच्यावर अशा गंभीर गुन्ह्याची नोंद झाल्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Pages