शिक्षणप्रेमी प्रेम जरपोतवार व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनोना तर्फे विविध उपक्रम राबवून संविधान दिन साजरा :#prem -jarpotwar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शिक्षणप्रेमी प्रेम जरपोतवार व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनोना तर्फे विविध उपक्रम राबवून संविधान दिन साजरा :#prem -jarpotwar

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर :


शिक्षणप्रेमी प्रेम जरपोतवार व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनोना तर्फे विविध उपक्रम राबवून संविधान दिन साजरा करून संविधान उद्देशीकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. 26 नोव्हेंबर ला विद्यार्थांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध लेखन, रांगोळी, काव्य स्पर्धा, वक्तृत्व , घोषवाक्य , गीत गायन स्पर्धा,चित्रकला स्पर्धा घेवून स्पर्धेत क्रमांक मिळालेल्या प्रथम दोन क्रमांकास मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला.


थोर महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे म्हणून स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांची पुस्तके, बुक,पेन बक्षीस स्वरूपात देण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस साठी खबरकट्टा मुख्य संपादक तथा ताई फाउंडेशन अध्यक्ष गोमतीताई पाचभाई, मा. संतोष ठाकरे यांनी सहकार्य केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ उषा इटनकर यांनी भूषविले. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जुनोना चे मुख्याध्यापक मा.श्री मन्सराम आत्राम कु. चंदा पुट्टवार, , श्रीमती सुमित्रा चौधरी, कु ज्योती लहामगे, श्री प्रकाश गोरे, श्री प्रफुल्ल करवाडे आदी शिक्षकरुंद उपस्थित होते. आणि विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

कार्यक्रमाचे आयोजन प्रेम जरपोतवार मुख्य सहयोजक अभ्यासवर्ग जुनोना व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनोना यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रेम जरपोतवार तर आभार कु. इतिक्षा लाईणकर या विर्थिनीने केले.









Pages