स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टी हा सक्षम पर्याय:- गजानन पाटील जुमनाके:#jiwati - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टी हा सक्षम पर्याय:- गजानन पाटील जुमनाके:#jiwati

Share This

विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी घेतला गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश

जिवती येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीचा कार्यकर्ता मेळावा

खबरकट्टा /चंद्रपूर :जिवती :-


गोंडवाना गणतंत्र पार्टी हा सर्वाना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. इतर पक्षांसारखे पोकळ घोषणा देणारा पक्ष नसून खऱ्या अर्थाने गोरगरिबांना साथ देणारा पक्ष असल्याने गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व जाती धर्माला योग्य प्रतिनिधित्व देण्याचे काम गोंडवाना गणतंत्र पार्टीत केले जाते. सर्वांच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणारा गोंडवाना गणतंत्र पार्टी हा एकमेव पक्ष हाच व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सक्षम पर्याय आहे. असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केले.


जिवती येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यात तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश केला. अनिता नामेवार, सुदाम नियुक्ती बताने, कैलास नाईक आडे, प्रेम काकडे, नानाजी बिलादार, देशमुख साहेब, कैलास आडे, सूर्यकांत कांबळे, गोपीनाथ गावळे, बळीराम मेकाले, आनंद हरगिले, संजय शिंदे, गफार शेख, फुलसिंग आडे, कमालकार राऊतवाड, वैजनाथ हमपले, परमेश्वर कळवढे, विनायक चव्हाण, शामराव चव्हाण, राम जाधव, देविदास राठोड, भारत बिरादार इत्यादी कार्यकर्त्यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश घेतला.



यावेळी मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्या सतलूबाई जुमनाके, चंद्रपूर जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंगजी जाधव, प्रदेश महासचिव अब्दुल जमीर भाई, प्रदेश प्रवक्ते मेहबूब भाई शेख, जिल्हाउपाध्यक्ष राजे संजीव आत्राम, गोंडवाना गडकिल्ले सा संरक्षण समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील जुमनाके, गोंडवाना गणतंत्र पार्टी जिवती तालुकाध्यक्ष ममताजी जाधव, माजी सभापती भीमराव मेश्राम, निशिकांत सोनकांबळे, माजी सरपंच हनुमंत कुमरे, जमालुद्दीन शेख, राजुरा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष फारुख भाई शेख, आनंदराव शेडमाके, सत्तर शेख, सोनेराव पेंदोर, अनिता धुर्वे, मारोती बेल्लाळे, उर्मिला बेल्लाळे, नामदेव जुमनाके जगेराव सिडाम उपस्थित होते.




Pages