पैगंबर मोहम्मद बिल व मुस्लिम समाजाचे आरक्षण तात्काळ लागु करण्यात यावे:#bhrahmpuri - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पैगंबर मोहम्मद बिल व मुस्लिम समाजाचे आरक्षण तात्काळ लागु करण्यात यावे:#bhrahmpuri

Share This

वंचित बहुजन महिला आघाड़ीची निवेदनाद्वारे मागणी

खबरकट्टा /चंद्रपूर:ब्रम्हपुरी:-


पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम समाजाला ५% आरक्षण मिळण्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार २२/११/०२१ ला मा. उपविभागीय अधिकारी यांच्या व्दारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन सादर करण्यात आले मागील अधीवेशनात वंचित बहुजन आघाड़ी ने विधानपरिषद सदस्य कपील पाटील यांच्या माध्यमातुन ' पैगंबर मुहम्मद बिल ' विधानपरीषद मध्ये मांडले होते


न्यायालयाने मान्यता दिलेल्या मुस्लिम समाजाच्या ५% शैक्षणिक आरक्षण तात्काल लागु करण्यात यावे

धार्मिक भावनेत तेढ निर्माण करणा-यावर कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल वंचित बहुजन आघाड़ी ने शासनाला सपुर्द केले आहे ते बिल येणा-या अधिवेशनात मंजुर करून तात्काळ कायद्यात रुपांतर करावे . महाराष्ट्र व वक्फ बोर्डाच्या मिळकती मध्ये वाढ करुन इमाम, मोईजीन, खुदाम, हजरत यांना मासिक वेतन सुरू करावे व वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अवैध झालेला कब्जा हटवुन त्या जागेचा अल्पसंख्यक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा . संत विचाराचे प्रसार ,प्रचार , करणा-या ह.भ.प. किर्तनकार यांना मासिक वेतन देण्यात यावे. सार्थी, बार्टी, महाज्योती, प्रमाने मुस्लिम अल्पसंख्यक समाजातील विद्यार्थ्था साठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.

वरील सर्व मागण्या संदर्भातील पैगंबर मोहम्मद बिल सरकारने लागु करावे करीता वंचित बहुजन महिला आघाड़ी ब्रम्हपुरी तर्फे मा.उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी वंचित बहुजन महीला आघाडी तालुकाध्यक्षा लीना ताई रामटेके, तालुका महासचिव शीतल गायकवाड, प्रतीमा डांगे, लता मेश्राम,जया सहारे, प्राप्ती गेडाम, कोषाध्यक्षा प्रमीला पाटील,कीरण मेश्राम, अर्चना गणवीर, योगीता रामटेके,प्रीती हुमणे, सुकेशनी बन्सोड,नीरूलता बन्सोड, शारदा घोनमोडे, जास्वंदा घुटके व इतर कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

Pages