खबरकट्टा /चंद्रपूर :ब्रम्हपुरी :-
पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे वाहतूक शाखेत पोलीस हवालदार पदावर कार्यरत असणारे व कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार म्हणून सर्वपरिचित असलेले फिरोजखान हमीद उल्लाह खान पठाण (बक्कल नं ९९४ ) वय:- ४९ वर्ष , हे स्थानिक शिवाजी चौकात दि. १४/११/२०२१ रोजी कर्तव्यावर हजर होते . तेव्हा घटनेतील आरोपी नामे सुरज मोरेश्वर गरफडे वय- २८ वर्ष , रा. चांदगाव दुपारी ३:३० ते ४ वाजताच्या दरम्यान चांदगाव रोडवर रस्त्याच्या मधोमध आपले कब्जातील मोटारसायकल आडवी उभी करून वाहतुकीस अडथळा करीत होता . तेव्हा पोलीस हवालदार पठाण यांनी आरोपीस वाहतूकीस अडथळा न करण्याबाबत सांगितले. त्यामुळे आरोपीने पोलीस हवालदार पठाण यांच्या जवळ येऊन तू बाजूला हो म्हणणारा कोण बे मादरचोद ? साल्या मादरचोद तुले मारून टाकतो. असे बोलून कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून येऊन छातीवर जोरदार बुक्की मारली . तसेच कॉलर पकडून त्यांना ओढतान केली त्यामुळे पोलीस हवालदार पठाण यांचे शासकीय गणवेशाचे शर्टाचे बटन , नेमप्लेट व चष्मा तुटून खाली पडला . तेव्हा फिर्यादीने आरोपीला कसेबसे पकडून बाजुला करून वाहतूक शाखेतील नायक पोलीस शिपाई राहुल लाखे यांना फोन करून घटनास्थळी बोलावले . तेव्हा पोलिसांनी आरोपीस समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलीस हवालदार पठाण यांनी आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली.
त्यामुळे ठाणे अंमलदार यांनी आरोपीविरुद्ध अप. क्रं. ७०३/ २०२१ नुसार भांदवी कलम ३५३, ३३२, ३२३, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करुन केली . आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली . सदर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून आरोपीविरुद्ध यापूर्वी सुद्धा अप. क्रं. ४६९/ २०२१ नुसार पोक्सो कायदा कलम १२ व ३५४ (अ) , ३५४ (ब) , ४४१ भांदवी नुसार गुन्हा दाखल असून नुकताच तो जमीनानावर सुटून बाहेर आला होता . घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर करीत आहेत . पोलिसांवर अगोदरच कामाचा ताण असून भरचौकात घडलेल्या या निंदनीय प्रकारामुळे समाजातून रोष व्यक्त केला जात आहे .