सरपंच राजेश कवठे व वढोली ग्रामपंचायत वासियांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचा खंबीर पाठिंबा
आज दिनांक 1/11/2021 ला अखिल भारतीय सरपंच परिषद जिल्हा चंद्रपूरच्या वतीने तालुका गोंडपिपरी येथील वढोली ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा सुरु असताना तलाठी यांनी मुजोर पणा केला आणि ग्रामसभेचा अपमान केला आहे. तसेच कर्तव्यदक्ष सरपंच राजेश कवठे यांच्याशी उद्धटपणे वर्तन करणाऱ्या अशा मुजोर तलाठी यांना चौकशी करून तात्काळ निलंबीत करण्या करिता. जिल्हाअधिकारी मा. गुल्हाने साहेब चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अँड. देवा पाचभाई, प्रशांत कोपूला उपसरपंच तिरवंजा, निखिलेश चामरे उपसरपंच ताडाळी, नंदकिशोर वाढई सरपंच कळमना, पारस पिंपळकर, प्रेम जरपोतवार उपस्थित होते.