श्रमदानातून लोहारा तलाव परिसर झाला स्वच्छ:#lohara - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



श्रमदानातून लोहारा तलाव परिसर झाला स्वच्छ:#lohara

Share This

 

दर रविवारी स्वच्छता : रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन संस्थेचा पुढाकार.

खबरकट्टा /चंद्रपूर :


चंद्रपुर: येथील लोहारा ग्रामपंचायत परिसरात असलेला लोहारा तलाव. येथे नागरिक मोठ्या प्रमाणात पिकनिक करण्याकरिता येतात व प्लास्टिकचे रॅपर, प्लास्टिकचे पत्रावळी, प्लास्टिकचे बॉटल, प्लास्टिकचे ग्लास, काचाचे बॉटल इत्यादी येथेच टाकून देतात त्यामुळे लोहारा तलावाचा व निसर्गाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास ओळखून रक्षण धरणीमातेचे फाउंडेशनच्या सदस्यांनी श्रमदान करून परिसराची स्वच्छता केली.


यावेळी परिसरातील कचरा गोळा केला त्यामुळे येणारा पर्यटकाला सुविधा झाली आहे. दर रविवारी विविध ठिकाणी मंदिरे ,सामाजिक स्थळे, शासकीय कार्यालय, पर्यटन स्थळ इत्यादी स्थळांची स्वच्छता मोहीम मागील तीन वर्षापासून करण्यात येत आहे. या स्वच्छते मोहिमे मध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा असे संस्थेचे सदस्य आकाश नवले यांनी व्यक्त केले.

यावेळी श्रमदानासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल कोटकर, राजीव शेंडे, आकाश नवले ,सुरज हजारे, सुरज नवले, विशाल पेंदोर, हरप्रीत सिंग,गौरव वरारकर, मृणाल वडगावकर,नंदकिशोर बलारवार,माधुरी शेंडे,रश्मी कोटकर,भूषण सोनकुसरे,विजय मोहरे,हर्ष पेंदोर,रिदम कोटकर आदींनी सहभाग घेतला.

Pages