स्थानिक गुन्हे शाखाने मृतकांची ओळख पटवून व खुनाचा आरोपी निष्पन्न करून आरोपी अवघ्या तीन तासात केली अटक
खबरकट्टा / चंद्रपूर :
आज दिनांक 16/ 10/ 2021 रोजी पो. स्टे पडोली येथे सकाळी दरम्यान खबर मिळाली की पो. स्टे पडोली हद्दीतील सिनर्जी वर्ल्ड परीसरातील मागील बाजूस एका अनोळखी पुरुषाचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडून आहे अशी माहिती प्राप्त झाली. सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर.मा. श्री अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व पो. नी बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांनी घटनेचे गांभीर्य पाहून घटनास्थळावर तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली. घटनास्थळावर पडून असलेला मृतक हा अनोळखी असून त्याचे अद्याप पर्यंत ओळख पटलेली नव्हती तसेच घटनास्थळावर कुठलाही पुरावा किंवा हत्यार दिसून येत नव्हते.सदर घटनेचे गांभीर्य पाहून संदरचा खून हा गुंतागुंतीचा असल्याने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री.अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ तपास सुरू केला.
घटनास्थळावर एक 40 ते 45 वयाचा इसम रोडच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. बारकाईने पाहणी केली असता त्याच्या डोक्यावर जबर जखमा दिसून आल्या त्यावरून सदर मृतकाची ओळख पटवण्याकामी स्थागुशा चे अधिकारी व कर्मचारी यांनी तपास सुरू केला. यावरून पथकाने दुर्गापूर,बंगाली कॅम्प, रयतवारी अष्टभुजा,प्रकाश नगर अशा विविध भागांत मृतकाचा घटनास्थळावरील फोटो लोकांना दाखवून अनोळखी मृतक इसम कोण आहे याबाबत माहिती घेतली असता पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे यांचे पथकास मृतक हा राजू अनंत मलिक यांचे वय 45 वर्षे व्यवसाय मजुरी रा. प्रकाश नगर अश्टभुजा वॉर्ड चंद्रपुर हा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गोपनीय सूत्रदाराकडून माहिती घेतली असता त्याचे नाव राजू अनंत मलिक असल्याचे पुष्टी मिळाली.स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी अधिक माहिती प्राप्त केली असता मृतक व त्याची पत्नी यांचेसह संशयित इसम नामे जितेंद्रसिंह भंडारी यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याची माहिती प्राप्त झाली. तसेच संशयित इसम हा मृतक व त्याच्या पत्नीच्या सतत संपर्कात असल्याबाबत विश्वासनीय माहिती प्राप्त झाली.
यावरून संशयित नावे जितेंद्रसिंह भंडारी यांचे बाबत तांत्रिक तपास घेऊन आलो व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व पोलीस उपनिरीक्षक संदीप काकडे यांनी त्याच्याकडून कसून चौकशी केली परंतु संशयित इसम हा उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर त्याची उलट उलट चौकशी केली असता त्यावरून त्याने दिलेल्या माहितीवरून यातील संशयित इसमानेच खून केला असल्याचा संशय बळावला त्यानंतर त्याला विश्वासात घेऊन पोलीस भाषेत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.त्याच्याकडून मृतक बाबत चौकशी केली असता त्याचे मृतकाच्या पत्नीबरोबर मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते ती मागील 1 वर्षापासून मुलासह तीच माहेरी कांकेर राज्य छत्तीसगड येथे गेलेले आहे त्या दोघांचे प्रेम संबंधांमध्ये मयत इसम हा अडसर होत असल्याने त्याला ठार मारण्याचा निश्चय आरोपी इसमाने केला त्यावरून दिनांक 15/ 10/ 2021 चे रात्री सात वाजता दरम्यान आरोपीने मृतकाचे सिनर्जी वर्ल्ड येथील निर्जन परिसरात नेऊन त्याला दारू पाजली व त्यास लोखंडी राडणे डोक्यावर मारून जीवनाशी ठार मारल्याचे कबूल केले.
सदरची यशस्वी कामगिरी मा. श्री.अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो. नी.बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे, अतुल कावळे, यांचेसह पो. हवा संजय आतकुलवार, स्वामी चालेकर, पंडित वऱ्हाडे, ना. पो. कॉ.गजानन नागरे पो.शी प्रशांत नागोसे, अमोल धंदरे संदीप मुळे रवींद्र पंधरे नितीन रायपुरे कुंदसिंग बावरी, प्रांजल झिलपे, गोपाल आतकुलवार, गणेश मोहुर्ले, दीपक डोंगरे प्रशांत धुडगंडे चा.नापोशी दिनेश अराडे यांनी केली