राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून चंद्रपूर व अहेरी शहरात प्रत्येकी ३ ऑक्सिजन मिनी व्हेटींलेटर देण्यात आले. चंद्रपूर शहरात वाढती कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजासाठी आला धावून #rss - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून चंद्रपूर व अहेरी शहरात प्रत्येकी ३ ऑक्सिजन मिनी व्हेटींलेटर देण्यात आले. चंद्रपूर शहरात वाढती कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजासाठी आला धावून #rss

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर व अहेरी येथील कोरोनाची भयानक स्थिती पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चंद्रपूरच्या माध्यमातून सेवा भावनेतून चालणाऱ्या संस्था व रुग्णालयाला प्रत्येकी ३ ऑक्सिजन व्हेटींलेटर देण्यात आले. या कार्यक्रमात चंद्रपूर येथे मा.नगर संघचालक रवींद्रजी भागवत यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समिती चे अध्यक्ष वसंतराव थोटे, सचिव आशिष धर्मपुरीवार यांच्या उपस्थितीत डॉ.बेंडले यांना 1 व डॉ.पंत यांना 2 व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा कार्यवाह शैलेश पर्वते, नगर कार्यवाह विनय आत्राम, हे प्रामुख्याने उपस्थित होते.



त्या सोबतच अहेरी येथे ऑक्सिजन ची कमतरता भासू नये या उद्देशाने डॉ. अमोल किशोरराव पेशट्टीवार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहेरी तर्फे ३ ऑक्सिजन व्हेटींलेटर जिल्हा संघ चालक गजानन जी राहुलवार यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी नगर कार्यवाहक अभय भोयर, सहकार्यवाह क्षितीज कविराजवार , तथा गणेश बोडावार हे उपस्थित होते.


Pages