रक्तदूत मंगेश पाचभाई यांचे आव्हान : प्लाझ्मादान साठी कोरोना योध्यानी समोर यावे #plazma - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



रक्तदूत मंगेश पाचभाई यांचे आव्हान : प्लाझ्मादान साठी कोरोना योध्यानी समोर यावे #plazma

Share This
खबरकट्टा / रक्तदूत मंगेश पाचभाई यांचे आव्हान : 


🙏 प्लाझ्मादान साठी कोरोना योध्यानी समोर यावे

नमस्कार, आपल्यापैकी अनेक जण, जे कोविड संसर्गातून बरे झाले आहेत आणि सामाजिक बांधिलकी म्हणून प्लाझ्मा दान करण्यास उत्सुक आहेत. मात्र अनेकांना काही प्रश्न आहेत.




💠 प्लाझ्मा म्हणजे काय?

🔸रक्त प्लाझ्मा, पातळ द्रव किंवा ब्लड प्लाझ्मा हा रक्ताचा एक पिवळसर द्रव घटक आहे.


🔸 हा रक्ताचा द्रव भाग आहे ज्यामध्ये

माणसाच्या जीवनासाठी आवश्यक घटकद्रव्ये,पेशी आणि प्रथिने असतात. 

🔸हे शरीरात रक्ताच्या प्रमाणात सुमारे ५५% असते.


💠 प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

🔸कोरोनातून व्याधीमुक्त झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा किंवा रक्तद्रव कोरोनाबाधित गंभीर रुग्णाला देण्याच्या प्रकियेला प्लाझ्मा थेरपी असे म्हणतात.


💠 कोण करू शकते प्लाझ्मा दान?

🔸कोरोना व्याधीतून पूर्णतः बरी झालेली व्यक्ती, डिस्चार्ज किंवा होम क्वारंन्टाईन नंतर २८ दिवसांनंतर प्लाझ्मा दान करू शकते.
🔸वय १८ ते६० असावे.
🔸वजन ५० किलो पेक्षा जास्त असावे.


💠 कोरोनातून बरी झालेली व्यक्ती एकूण किती दिवस प्लाझ्मा डोनेट करू शकते?

🔸संसर्ग झाल्यापासून चार महिन्यापर्यंत प्लाझ्मा दान करू शकते. (पहिले १४ + २८ दिवस सोडून) 


💠 कोरोना संक्रमण होऊन बरी झालेली झालेली व्यक्ती किती वेळा प्लाझ्मा डोनेट करू शकते?

🔸दर १५ दिवसांनी कोरोनातून 

बरी झालेली व्यक्ती प्लाझ्मा डोनेट करू शकते.


💠 प्लाझ्मादानामुळे शरीरावर कुठले दुष्परिणाम होतात का?

🔸अज्जिबात नाही.
🔸दान केलेला ४०० ते ५०० मिली प्लाझ्मा, शरीर काही तासात पुन्हा बनवते.
🔸शरीर स्वास्थ्यावर काहीही परिणाम होत नाही.


💠 पूर्वीचे काही आजार असतील तर प्लाझ्मादान करु शकतो काय ?

🔸 थायरॉईड, मधुमेह आणिउच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीदेखील रक्तपेढीतील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मादान करू शकतात.


💠 प्लाझ्मा दानासाठी काय पूर्वयारी काय करावी?

🔸भरपूर प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे.
🔸योग्य आहार 
🔸योग्य निद्रा 


💠 साधारणपणे प्रक्रिया (प्रोसीजर) काय असते?

🔸पात्र व्यक्ती कडून माहितीवजा फॉर्म भरून घेतला जातो.
🔸काही तपासण्या केल्या जातात.
🔸प्लाझ्मा डोनर डोनेशनसाठी योग्य असल्याची खात्री केली जाते.


💠 रक्त काढून झाल्यावर काय करतात ?

🔸केवळ प्लाझ्मा वेगळा काढून घेतला जातो.
🔸लाल रक्त पेशी पुन्हा शरीरात सोडल्या जातात.


💠 किती प्रमाणात प्लाझ्मा काढून घेतला जातो ?

🔸साधारणपणे ४०० मिली प्लाझ्मा काढून घेतला जातो.

🔸एका पेशंटला एका वेळी २०० मिली या प्रमाणे वापरला जातो.

🔸 म्हणजेच एका प्लाझ्मा दानातून

दोन रुग्णांचे जीव वाचवले जाऊ शकतात.

💠 प्लाझ्मा डोनेशनसाठी किती वेळ लागतो ?

🔸प्लाझ्मा डोनेशनपूर्वी काही तपासण्या (Covid IgG antibody titre testing) कराव्या लागतात त्यासाठी एक ते दीड तास लागतो.

🔸प्लाझ्मा डोनेशन साठी एक ते दीड तास लागतो.

💠 समाजात अनेक डोनर आहेत. मी एकट्याने प्लाझ्मा डोनेशन नाही केलं तर काय फरक पडतो ?

🔸सध्याच्या काळात अनेक ठिकाणी प्लाझ्माची कमतरता जाणवत आहे. 
🔸कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या व्यक्ती मध्ये कोरोना विषाणू विरुध्द प्रतिकारशक्ती तयार झालेली असते. 
🔸ही प्रतिशक्ती गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी फार उपयुक्त आहे.

कोरोना योध्यानी समोर येऊन रक्तदान तसेच प्लाजमा दान करावे

Pages