महिला सरपंचाचा पुढाकार : अडेगावात 17 साधे बेड व 3 ऑक्सिजन बेड चे ग्राम विलगिकरण रुग्णालय सोमवार पासून विलगिकरण केंद्र होनार सुरू #zari-jamni - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



महिला सरपंचाचा पुढाकार : अडेगावात 17 साधे बेड व 3 ऑक्सिजन बेड चे ग्राम विलगिकरण रुग्णालय सोमवार पासून विलगिकरण केंद्र होनार सुरू #zari-jamni

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : झरी-जामणी 
कोरोना काळात सरकारची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे अपुरी पडत असताना काही समाजसेवक व राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी पुढाकार घेत कोविड हॉस्पिटल उभारले आहेत, झरी तालुक्यातील अडेगाव येथे कोरोणाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे, ऑक्सिजन बेड न मिळाल्याने अनेकांनी आपले प्राण गमाविले आहे, अडेगाव व जवळच्या गावातील नागरिकांना प्राण गमावण्याची पाळी येऊ नये यासाठी अडेगाव ग्रामपंचायत च्या युवा महिला सरपंच सौ. सीमाताई दत्ता लालसरे यांनी ग्रामपंचायत मार्फत पुढाकार घेत अडेगाव येथे ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.

रुग्णालयात बेड अभावी नागरिक मृत्युमुखी पडत आहेत, अनेकांनी तर रुग्णालयाच्या बाहेरच ऑक्सिजन अभावी प्राण गमावले, झरी (जामणी) तहसील हे यवतमाळ, नागपूर व चंद्रपूर पासून खूप जास्त अंतरावर आहे, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला उपचारासाठी मोठे अंतर कापावे लागते यासाठी स्थानिक खाजगी कंपन्या मार्फत १७ साधे बेड आणि ३ ऑक्सिजन बेड ची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे,.
येणाऱ्या ८ दिवसात हे कोरोणा सेंटर रुग्णाच्या उपचाराकरिता सुरू करण्यात येणार आहे, या कोरोना ग्राम विलगिकरण सेंटरला तालुक्याचे तहसीलदार श्री गिरीश जोशी साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गेडाम साहेब, ग्राम दक्षता समितीच्या सचिव प्रांजली वाढई मॅडम, तलाठी श्री संजय थूल साहेब ग्रामपंचायत सदस्य संतोष पारखी, संजय आत्राम, इतर सर्व ग्रा.प सदश्श अडेगाव येथील आरोग्य सेविका संगीता कोवे मॅडम, आशा सेविका तसेच अडेगाव येथील युवा समाजसेवक मंगेश पाचभाई, अनिल आवारी, प्रणल गोंडे, व इतर नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.



Pages