WE CAN : सि एस आर फंडातून गडचांदुरात ऑक्सिजनयुक्त कोविड हॉस्पिटल उभारा वी कैन फाउंडेशनची मागणी - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



WE CAN : सि एस आर फंडातून गडचांदुरात ऑक्सिजनयुक्त कोविड हॉस्पिटल उभारा वी कैन फाउंडेशनची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर - 


गडचांदूर शहरात असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या सीएसआर फंडा अंतर्गत ५० बेडचे कोविड सेंटर उभारावे अशी मागणी वी कॅन फाउंडेशन गडचांदूर तर्फे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.


जिल्ह्यात कोरोना ( कोविड 19 ) प्रादुर्भाव वाढत असून शहरात सुद्धा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे . गडचांदूर हे औद्योगिक शहर असून येथे दररोज शेतकरी,मंजूर , कंपनी काम करणारे रोजगार , शहरात येत असतात , व बाहेरुन माल वाहतूक सुरु असते , गडचांदूरातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता , माणिकगड़ कंपनीच्या सी.एस.आर.फंडातुन ऑक्सिजन युक्त 50 बेडची सोय करून कोविड हॉस्पिटल उभारन्यात यावी अशी मागणी वी कैन फाउंडेशन गडचांदूरने मुख्यमंत्री व जिल्ह्याअधिकाऱ्यां, कड़े निवेदनातुन केली आहे. 


जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेली मोठी बाजारपेठ असून शहरात दोन तालुक्यातील नागरिकांनी ये जा असतात गडचांदुरात कोविड हॉस्पिटल नितांत गरज आहे , कोरोना संख्या वाढत असून अश्यावेळेस तरी कंपनीने पुढांकार घ्यावा ,असे मत सर्व सामान्य नागरिकामधे दिसत आहे.

Pages