समृद्धी महामार्गावर बस पेटली : 30प्रवासी ठार #samrudhhi_mahamarg_accident - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



समृद्धी महामार्गावर बस पेटली : 30प्रवासी ठार #samrudhhi_mahamarg_accident

Share This
खबरकट्टा / Bus Accident :

समृद्धी महामार्गावर रात्री 1.36 वाजता बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथील पिंपळखुटा येथे भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला.

बघा व्हिडीओ : 

बुलढाण्यात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी बस समृद्धी महामार्गावर पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. आगीने भराभर पेट घेतल्याने या बसमधून प्रवास करणाऱ्या 30 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत.

हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.नागपूरवरून खासगी प्रवाशी बस ही पुण्याला जात होती. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली.

या दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररुप घेतले. प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता न आल्याने यात ही मोठी जीवितहानी झाल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस कर्मचारी पी. आर. मुसदवाले यांनी दिली.

Pages