त्या वडाची तूच खरी प्रतिभा....! #NCP - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



त्या वडाची तूच खरी प्रतिभा....! #NCP

Share This
दिवंगत खासदारांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या माध्यमातून एक पोस्ट अचानक काल रात्री समाज माध्यमांवर फिरू लागल्याने "तूच दुर्गा... तूच रणरागिणी... ढाण्या वाघाची तू वाघीण" अश्या आशयाची श्रीमती धानोरकरांच्या फोटोसहित पोस्ट फिरू लागल्याने अनेकांच्या भोवया उंचावल्या.त्या पोस्ट च्या लेखकाने मालकाप्रति आपली लॉयल्टी दाखवून आपली नौकरी वाचविण्याचा प्रयत्न केला असल्या पासून ते दिवंगत खासदारांचा खरा वारसदार कोण इथपर्यंत चर्चा आल्यावर कोण कसा किती सक्षम यावर चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात पुढचे राजकीय समीकरण सामान्य मतदारांनी मांडायला घेतले असेलच.
खबरकट्टा / चंद्रपूर : संपादकीय :गोमती पाचभाई 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे काही दिवसांपूर्वी अकाली निधन झाले. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपायला अजून वर्षभराचा वेळ असल्याने पुण्यासोबतच चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याची शक्यता वरिष्ठ अधिकारी वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

सन 2919 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त चंद्रपूरची जागा शिवसेनेतून वेळेवर काँग्रेस मध्ये आलेल्या धानोरकरांच्या निमित्याने जिंकता आली. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातून संसदेत प्रतिनिधित्व शून्य झाले असले तरी मात्र चंद्रपूर च्या राजकीय वर्तुळात आतापासूनच लोकसभा निवडणुकीची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. दिवंगत खासदार धानोरकर यांच्या नंतर या लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व कोण करणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

खऱ्या अर्थी दिवंगत लोकप्रतिनिधिंचा खरा वारसदार म्हणून त्यांच्या परिवारातील प्राथमिक सदस्यांकडे बोट दाखवायची परंपरा आहे. मात्र गेल्या काही पोटनिवडणूकांचे दाखले बघता दुसऱ्याही शक्यता नजरेस येतात.

तसं व्यक्तिगत पातळीवर बघायला गेलोच तर् त्यांची खरी वारसदार ही पत्नीचं परंतु, आता त्या स्वतः आमदार असल्यावर लगेच राज्यातला पाय काढून दिल्लीत जाणे जरा कठीण. तरीही त्या सक्षम की दुसरं कुणी यावर मतदारांत प्रचंड कोतूहल असल्याने टीम खबरकट्टा ने आज वटपौर्णिमेच्या निमित्याने "त्या वडाची तूच खरी प्रतिभा " हा लेख लिहावयास घेतला असून हे लिखाण कोणत्याही राजकीय उद्देशाने प्रेरित नसल्याचे प्रतिपादन करीत आहोत.

तसं प्रतिभा या बाळू धानोरकर नावाच्या वडाची काळी सावलीच. पण सवलिचीही आपली एक तऱ्हा असतेच. जसा जसा सूर्य उगवतो तशी तशी जवळ येणारी व सूर्य डोक्यावर आला की लुप्त होणारी, पुन्हा मावळतीला लांब लांब जाणारी तशीच प्रतिभा आज उभी आहे बनून त्यांची काळी सावली.

बाळू धानोरकरां चा अगदी सर्वसामान्यातून उठून संसदेत जाऊन पोहोचण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आम्हांतूम्हा पेक्षा प्रत्यक्ष साक्षी अश्या त्या अनुभवकर्त्या. धानोरकरांच्या आमदार ते खासदार या अचानक झालेल्या उचलबांगडी नंतर आमदारकी त्यांना गिफ्ट म्हणून मिळाली. त्यात त्या हळूहळू रुढू लागल्या, अधिकारी ते पदाधिकारी सर्वांवर रोब झाडू लागल्या.अगदी पहिल्या दिवसापासूनच त्या फक्त आमदार नव्हत्याच तर् चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या जणू भावी उमेदवारच होत्या म्हणूनच तर् सूरूवाती पासूनच त्यांनी लोकसभा क्षेत्रात आपले दौरे कायम ठेवले होते.

2012 साली धानोरकरांच्या झालेल्या पोटाच्या गॅस्ट्रीक बायपास सर्जेरी Gastric bypass surgery is a type of bariatric, or weight loss, surgery नंतर त्यांच्या प्रकृतीचे पथ्य पाळण्यात प्रचंड प्रतिभा खर्च केल्यामुळे दिवंगत खासदारांना कदाचित झोपेच्या गोळ्यांचे झुरके घ्यावे लागले असावेत.

असो, प्रतिभा यांची प्रतिभा ही अनेकांपर्यंत पोहोचली असल्याचे अनेक दाखले दिवंगत खासदारांना उमजायला लागल्यावरही आपली मुंबई कशी स्वतंत्र ठेवायची याचे बाळकळू त्यांनी विविध व्यवसायिकांकडून घेत आपला राजकीय व्यवसाय नीट सांभाळायला लागल्या लागल्याच घरात घडणारे विपरीत प्रसंगांचे त्या थेट दिल्लीतील हाय कमाडं ते राज्यातील नाना पर्यंत गोडवे गात राहिल्या.

अश्यातच दिवंगत खासदारांना स्वकर्तूत्वा ने बांधलेल्या अनेक खोप्यांमध्ये तिजोरीची जागा कमी जाणवू लागल्याने प्रतिभा यांनी त्याच खोप्याच्या छतावर हळूच उंच झोका घेत रस्त्याच्या अलीकडे बोट दाखवले.... आपल्याला तिजोरी नकोच अनेक तिजोऱ्यांची एक मध्यवर्ती हवी "सत्यभामा जशी श्रीकृष्णाकडे हट्ट धरते तसा हे पारिजातकाच झाड माझ्याच दारात हवं" असा हट्ट धरत त्या अनेकदा नोकरभरती प्रक्रियेस स्थगिती मिळण्यास धडपडू लागल्या. केवढी ही तळमळ सामान्यांसाठी!

त्या मध्यवर्ती झाडाला खत पाणी घालता घालता त्यांनाही कळले नाही की माझा वड आतून खचत चाललाय. अनेक ठिकानून गोळा केलेली इतरही झाडाची गुलाबी पाने मोजता मोजता नात्यातला गुलाबीपणा केव्हाच काळाकुट्ट झालायं ! हेही कळायला आता मात्र वेळ निघून गेली होती. बाळू नावाचा प्रचंड प्रतिभामय वड आता पुरता त्रासला होता.त्यातच वणी च्या वाणीतून  गुलाबी पान देऊन सक्षम भविष्याचे स्वप्न उराशी बाळगून असणारे काही तरुण थेट इळीत जाऊन पोहोचले त्या इळी ने जी वणव्याची बिडी पेटवली त्यात संपूर्ण वड जळून खाक होईल असे प्रविण्य स्वतः प्रतिभा यांनाही वाटले नसावे हो.

पुढे काहीच दिवसांपूर्वी दिवंगत खासदारांना एका शासकीय कार्यालयातून "गुलाबी प्रेम पत्र" (नोटीस )आल्यावर,हा तर्  मरणाचा श्राप - कोण घेईल पाप या उक्तीप्रमाणे आपले हाथ सॅनिटायझर ने धुऊन मोकळे करण्याइतपत शहाणंपण कोरोना काळात त्या शिकल्या असाव्यात बहुतेक.म्हणून त्यांनी सोशल डिस्टन्स मेंटेन करत कदाचित खोप्यातून काढता पाय घेतला असावा!

पण वड तो वडचं त्यालाही फ़ांद्या पसरविताना मुळात भरपूर पाणी जिरविल्याचा अनुभव होताच म्हणून सूर्य डोक्यवार आला तरीही आपल्या सावलीची साथ न सोडता त्यानेच माघार घेत आपला संताप दुसऱ्या रवी वर काढायची "फुल्ली लोडेड" योजना "बसंत सिंग" यांच्या मालकीने आखली पण त्या रवी चे नशीब बलवत्तर म्हणून "3 मे"ला महामृत्युन्जय लाभी पडला.

प्रतिभावान दिवस पुढे सरकत होते, वड अधिक पोखरत होता खचत होत अचानक त्या पारिजातकाच्या मध्यवर्ती झाडावर कुणीतरी गुलर मारली आणि सगळे समपक्षी विरोधात चिवचिवाट करू लागले. त्या कल्लोळाने वड वाळत जात होता मात्र तेव्हाही प्रतिभा यांनी आपली 16 अंकी प्रतिभा 16 शृंगाराच्या मदतीने उत्तम वठविली.17 वा दिवस उजाडला नंतर 18 त्यानंतर 19 प्रतिभा आपल्या तोऱ्यात पण 20 साव्याला घडलेल्या घटनेत काळजाचा तुकडा अटकेत आला व वड पुरता खचला.

ते प्रेम पत्र त्यानंतर आलेले साळ्याचे घाव घालणारे दुसरे निमंत्रण पत्र ते अटक सत्र या सर्व घटनांमध्ये आपली भूमिका चोख ठरावी म्हणून वडाकडे जरी दुर्लक्ष झाले चालेल सावली जगली पाहिजे या भूमिकेतून दत्तात्रयांना न्याय मिळवून देण्याकरिता नानाकडे धाव घेणे जास्त गरजेचे होते सोबतच तिवारी यांचा गेम करत सौहेल भाई व चोखारे यांनाही शहराची जहागिरी मिळवून द्यायचीच होती म्हणून 24व्या दिवशी नानांच्या खांद्याचा आधार घेत प्रतिभा मुंबईत ढसाढसा रडत न्याय मागू लागली.

अश्यातच वड पूर्ण कोलमडला,पूर्वजानां हार घालू लागला तरी प्रतिभा काही उच्चारेना पुढे दुसऱ्याच दिवशी नियतीने खेळ साधला आणि वड कायमचा खचला तेव्हाही आम्ही चेहऱ्यावरची चमक (फेशिअल )अधिक चमकविण्यात आपली प्रातिभा खर्च केलीच की.याची ज्वलंत प्रातिभा कार्यकर्त्यांच्या आवाहनातून त्या जळत्या चितेनेही अनुभवली!

म्हणून आवाहन आहे,अश्या ह्या प्रचंड प्रतिभावान भावी लोकसभा उमेदवाराला सुतुकाचा कडू घास घेऊ देत आपल्याला घरी शांत निवांत बसू दया. लागू दया एकदाची पोटनिवडणूक मग बघू कोण कोणत्या वडाची खरी प्रातिभा!

मतदारांनो आता तरी जागे व्हा... साधे रेफरन्स पत्र द्यायसाठी पाच-दहा हजार मागणाऱ्या लोकप्रतिनिधिनींना निवडून द्यायचे काय हा प्रश्न निदान आता तरी स्वतः ला विचारा...!!

राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूरची पोटनिवडणूक जाहीर झाल्यास चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुनर्वापर करण्याजोगे आवश्यक साहीत्य उपलब्ध आहेत किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.. यामध्ये शपथपत्र (Form 26), नामनिर्देशित पत्र (Form २A), Form A and Form B, निवडणूक आलेल्या उमेदवाराला द्यावयाचे प्रमाणपत्र (Form 22), बोटाला लावायची शाई, पिंक पेपर सील आणि ग्रीन पेपर सील यांबाबत तात्काळ आढावा घेऊन अंदाजित मागणी करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्यामुळे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेबरोबरोच चंद्रपूर लोकसभेची देखील पोटनिवडणुक लागणार काय? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

Pages