प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर वरोरा, चिमुर,ब्रम्हपुरी व गडचांदूर येथील नागरिकांनी लाभ घ्यावा#RTO CHANDRAPUR - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर वरोरा, चिमुर,ब्रम्हपुरी व गडचांदूर येथील नागरिकांनी लाभ घ्यावा#RTO CHANDRAPUR

Share This

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर

वरोरा, चिमुर,ब्रम्हपुरी व गडचांदूर येथील नागरिकांनी लाभ घ्यावा#RTO CHANDRAPUR

खबरकट्टा/प्रतिनिधी:चंद्रपूर,

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी व गडचांदूर या तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्क्या अनुज्ञप्ती, खाजगी संवर्गातील वाहनाची नोंदणी इत्यादी कामांकरिता माहे नोंव्हेंबर महिन्यातील एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे दिनांक 24 नोव्हेंबर, शासकीय विश्रामगृह, चिमुर येथे 25 नोव्हेंबर, एन.एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे दिनांक 26 नोंव्हेंबर तर शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर येथे दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

इच्छुक नागरिकांनी parivahan.gov.in या संकेतस्थळावर सारथी सॉफ्टवेअर मध्ये स्लॉट बुकींक करून अपॉईंन्टमेंन्ट घ्यावी. अपॉईंन्टमेंन्ट नसल्यास ऑनलाईन चाचणी देता येणार नाही. तरी या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक जाधव यांनी केले आहे.

*****************(((()))))*****************