आभासी ( ऑनलाईन )चित्रकला स्पर्धेने पक्षी सप्ताह केला साजरा#rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आभासी ( ऑनलाईन )चित्रकला स्पर्धेने पक्षी सप्ताह केला साजरा#rajura

Share Thisआभासी ( ऑनलाईन )चित्रकला स्पर्धेने पक्षी सप्ताह केला साजरा,

खबरकट्टा/प्रतिनिधी:राजुरा

- श्रुती रायपूरे प्रथम ,कस्तूरी बेले द्वितीय, वेदांती गर्गेलवार व प्रथमेश गादंगिवार संयुक्तपणे तृतीय क्रमांकाचे ठरले मानकरी.

वन्यप्रेमी मारुती चीतमपल्ली यांचा जन्मदिन व पक्षी संशोधक स्वर्गीय सलीम अली यांची जयंती नीमीत्याने महाराष्ट्र शासनाने दिनांक ५ ते १२ नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून घोषित केला होता. सामाजिक वणिकरण विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी यू.एम. जंगम यांच्या मार्गदर्शनात सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले


बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श हायस्कूल येथील राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या पुढाकाराने सदर स्पर्धेत आभासी (ऑनलाईन ) पधतीने ३८ विध्यार्थीनि सहभाग दर्शविला. त्यापैकी श्रुती योगेश रायपूरे हिचा प्रथम क्रमांक , कस्तूरी रवींद्र बेले हिचा द्वितीय तर वेदांती गर्गेलवार व प्रथमेश गादंगिवार यांचा संयुक्तपणे तृतिय क्रमांक आला. 


कोरोणा या जागतिक महामारीची गंभीर परिस्थिती बघता विध्यार्थीनि घरी राहूनच या स्पर्धेत उत्स्पूर्त सहभाग दर्शविला. येत्या काही दिवसात या विध्यार्थीना बक्षिसे देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. क्रमांकप्राप्त विध्यार्थी तसेच या स्पर्धेत सहभागी विध्यार्थीचे व्ही. एम.कुंदोजवार , वनपाल , मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर व आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे यांच्यासह सर्व शिक्षक व्रुंदांनी अभिनंदन केले,