गावांतील नवयुवकांनी लक्ष्मी पुजा एवजी पुस्तक पुजा करून ठेवला समाजापुढे नवा आदर्श#rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गावांतील नवयुवकांनी लक्ष्मी पुजा एवजी पुस्तक पुजा करून ठेवला समाजापुढे नवा आदर्श#rajura

Share This

गावांतील नवयुवकांनी लक्ष्मी पुजा एवजी पुस्तक पुजा करून ठेवला समाजापुढे नवा आदर्श,

खबरकट्टा/प्रतिनिधी:राजुरा

घर असो किंवा कार्यालय दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठं महत्त्व आहे.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो.

दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाइद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. परंतु हा सण गावांतील नवयुवकांनी नव्या पद्धतीमध्ये साजरा केला आहे. नवयुवकांनी पुस्तक पुजा करून समाजाला नवी प्रेरणा मिळावी म्हणून या मुळ उद्देशांने हा आगळा वेगळा उपक्रम नवयुवकांनी गावांत राबविला आहे. पुस्तक पुजना वेळेस उपस्थितीमध्ये गावांचे माजी सरपंच सुरेशजी आस्वले, माजी उपसरपंच ईशादजी शेख, वाचनालय विद्यार्थी उपस्थितीमध्ये सचिन येलमुले, आशिष मोहुलै, भास्कर गांवतुरे, आकाश मोहुलै, अक्षय बोढे, अक्षय मोहुलै, निखिल आस्वले, संकेत वांढरे, दिपक खेडेकर,रोहित येरवार, निवूती मोहुर्ले,प्रियांका तेलंग,सपना काळे, प्राची चिडे,राणी बोधे,पायल येरेवार, वैष्णवी रागीट, व अन्य विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यातून आपल्याला निश्चित भविष्यात नवीन बदल पाहायला मिळेल.