आ. सुधीर मुनगंटीवार राज्याच्या लोकलेखा (Public Accounts Committee (PAC) समितीवर अध्यक्षपदी : महाविकास आघाडी सरकार तर्फे विधानसभेच्या विविध समित्यांची स्थापना व नियुक्त्या जाहीर#Chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आ. सुधीर मुनगंटीवार राज्याच्या लोकलेखा (Public Accounts Committee (PAC) समितीवर अध्यक्षपदी : महाविकास आघाडी सरकार तर्फे विधानसभेच्या विविध समित्यांची स्थापना व नियुक्त्या जाहीर#Chandrapur

Share This


आ. सुधीर मुनगंटीवार राज्याच्या लोकलेखा (Public Accounts Committee (PAC) समितीवर अध्यक्षपदी : महाविकास आघाडी सरकार तर्फे विधानसभेच्या विविध समित्यांची स्थापना व नियुक्त्या जाहीर

खबरकट्टा/प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. 

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या सरकारमध्ये मंत्रीपदाची सूत्रे न मिळणार्‍या आमदारांना विविध समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. विधानसभेचे सभापती नाना पटोले यांनी विधानसभेच्या सदस्यांना विविध समित्यांमधून नामनिर्देशित केले.शुक्रवारी विधिमंडळाने याबाबत आदेश जारी केला. विधिमंडळाच्या 13 संयुक्त समित्या स्थापन केल्या आहेत. तसेच विधानसभेच्या अनेक समित्यांची स्थापना करण्यात आली. 

यात भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे विधिमंडळाच्या लोकलेखा (Public Accounts Committee (PAC) समितीचे अध्यक्ष असतील. लोकलेखा समितीचे सदस्य म्हणून कॉंग्रेसचे आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि अन्य आमदारांचा समावेश आहे. कॉंग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांना अंदाज समितीचे प्रमुख केले गेले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांची सार्वजनिक उपक्रम समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.