आज बिबी येथे दिव्यग्राम महोत्सव स्वच्छता अभियान व फटाकेमुक्त दिवाळी साजरी#korpana - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आज बिबी येथे दिव्यग्राम महोत्सव स्वच्छता अभियान व फटाकेमुक्त दिवाळी साजरी#korpana

Share This


आज बिबी येथे दिव्यग्राम महोत्सव

स्वच्छता अभियान व फटाकेमुक्त दिवाळी साजरी,

खबरकट्टा/प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांना जीवनगौरव व राजेंद्र परतेकींना सेवार्थ सन्मान प्रदान सोहळा

समाजसेवक डॉ.गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ गृपचे आयोजन

कोरपना तालुक्यातील बिबी येथे समाजसेवक डॉ.गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठाण व सेवार्थ गृप तर्फे आयोजित 'दिव्यग्राम २०२०' महोत्सवाचे करण्यात आले आहे. राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा मानाचा जीवन गौरव पुरस्कार नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते व राज्यपाल नियुक्त माजी आमदार गिरीश गांधी तर सेवार्थ सन्मान ३६५ दिवस चालणा-या पालडोह येथील जि.प.शाळेचे आदर्श शिक्षक राजेंद्र परतेकी यांना प्रदान करण्यात येईल. आज (ता.१५) सायंकाळी ६ वाजता मुख्य कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार अॅड.वामनराव चटप, स्वागताध्यक्ष संतोष उपरे तर अतिथी म्हणून डॉ.गिरीधर काळे, पं.स. सदस्य सविता काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नाईक, ठाणेदार गोपाल भारती, सरपंच मंगलदास गेडाम उपस्थित राहतील.


बिबी येथील समाजसेवक डॉ.गिरीधर काळे हे मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्नांवर वयाच्या १६ वर्षांपासून तर आजतागायत ३५ वर्षे निशुल्क उपचार करत असून चार लाखांहून अधिक अस्थिरुग्नांना त्यांनी बरे केले आहेत. ग्रामसभेने त्यांना 'डाॅक्टर' ही ऐतिहासिक उपाधी दिली. त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ सदर पुरस्कार प्रदान केले जातात. २०११ पासून बिबी येथे दिवाळी ही ग्रामस्वच्छता अभियान व फटाकेमुक्त व प्रबोधनात्मक दिव्यग्राम महोत्सवाने साजरी होते.

यंदा कोरोना योद्धा व गुणवंत विद्यार्थी सत्कार, सामाजिक रांगोळी व मेहंदी स्पर्धा तसेच कोव्हीड जनजागृती दिंडी कोरोना नियमांचे पालन करुन काढण्यात येईल. कोरोना नियमांचे पालन करुन कार्यक्रमात उपस्थित रहावे असे डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ गृपचे रत्नाकर चटप, अविनाश पोईनकर, अॅड.दीपक चटप, हबीब शेख, गणपत तुम्हाणे, राहुल आसूटकर, सतिश पाचभाई, स्वप्निल झुरमुरे, राजेश खनके, संदीप पिंगे, इराना तुम्हाणे, विठ्ठल अहिरकर, चंदू झुरमुरे, सुरज लेडांगे,विशाल अहिरकर, महेश नाकाडे, समीर शेख, प्रमोद विरुटकर, राकेश बोबडे, ॠषिकेश पावडे, आकाश उरकुडे, गणपत मडकाम, चंपत तुम्हाणे, महेश राठोड व मित्रमंडळींनी कळवले आहे.