सकमुरात १५० घरावर लागल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या..#gondpipari - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सकमुरात १५० घरावर लागल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या..#gondpipari

Share This


सकमुरात १५० घरावर लागल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या..

खबरकट्टा/प्रतिनिधी:गोंडपीपरी

गोंडपीपरी:- गोंडपीपरी तालुक्यातील सकमुर (चेकबापूर) गावात ओबीसी जनगणनेच्या जनजागृतीसाठी तीन दिवसांत १५० घरांवर पाट्या लावल्या गेल्या आहेत. गावातील तरुण मंडळी पुढे येऊन ओबीसी जनगणना जनजागृती आणि पाटी लावा मोहिम गावात राबविली.

गेल्या नव्वद वर्षापासून ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झाली नाही. सन १९३१ नंतर भारतात ओबीसी जनगणना झाली नसून, ओबीसी समाजाची अधिकृत आकडेवारी आजपर्यंत कळली नाही आणि त्यामुळे ओबीसी समाज हा शासन दरबारी वंचित आहे. ओबीसी समाज‌ हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० ते ६० टक्के असूनही भारतीय व्यवस्थेच्या प्रत्यक्ष कार्यप्रणाली मध्ये सहभागी करुन घेतले जात नाही.

ओबीसी प्रवर्गाची जनगणना झालीच तर शासनाच्या विविध योजना, विभागीय कार्यालय उदाहरणार्थ शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय याठिकाणी हक्क अधिकार देणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून ओबीसी जनगणना होणे आवश्यक आहे. यासाठीच सकमुरातील तरुण मंडळीने पुढाकार घेऊन पाटी लावा मोहीम सुरू केली होती.


यांत संदीप पिपरे, प्रणय काळे, सुरज काळे, सुरज दहागावकर, सुरज मुत्येमवार, प्रशांत मुत्येमवार, श्रीकांत सांगडे, शुभम चिताडे, वैभव कुचुलवार, निखिल चनकापुरे, राहुल तेलजीलवार, बाल्या तांगडे, धनराज तांगडे, प्रशांत तांगडे, बबन कोरडे, सुरेंद्र काळे, रुपेश गिरसावळे, सुरज चनकापुरे, नागेश किरमोरे, गौरवजी घुबडे, नितेश जुनघरे, तसेच गावातील इतर तरुणांनी, गावातील नागरिकांनी सहकार्य करून ही मोहीम यशस्वी केली..