युवकाची गळफास लावुन आत्महत्या तडोधी ( नाईक ) येथील घटना#chimur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

युवकाची गळफास लावुन आत्महत्या तडोधी ( नाईक ) येथील घटना#chimur

Share This


युवकाची गळफास लावुन आत्महत्या

तडोधी ( नाईक ) येथील घटना,

खबरकट्टा/प्रतीनीधी:चिमूर

चिमूर तालुक्यातील तडोधी ( नाईक ) येथील दहिकर विद्यालयाच्या आवारातातील चिंचेच्या झाडाला गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.मृतक हा टेकेपार येथील रहिवाशी असुन त्याचे नाव सौरभ मोतीराम कुळमेथे वय २१ वर्ष आहे.

चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टेकेपार येथील माजी पंचायत समीती सदस्य मोतीराम कुळमेथे यांचा सौरभ हा लहान मूलगा आहे.भाऊबिजे करीता बहिन व भाऊजी आले होते व घरात सर्व आंनदी वातावरण होते.बाहेरूण येतो असे सांगूण सौरभ घराबाहेर पडला.

जवळच असलेल्या तडोधी (नाईक) येथील दहिकर विद्यालयाच्या परीसरात असलेल्या चिंचेच्या झाडात गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळला.

घटनेची माहीती कुंटूब व पोलीस विभागाला देण्यात आली.पोलीसांना घटनास्थळी पोहचुन पंचणामा केला व प्रेत उत्तरीय तपासणी करीता उप जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले.आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नसुन चिमूर पोलीसांनी मर्ग दाखल केला.पुढील तपास प्रभारी ठानेदार मंगेश मोहोड यांचे मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत.