घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान नवतळा येथील घटना#chimur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान नवतळा येथील घटना#chimur

Share This

घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

नवतळा येथील घटना,

खबरकट्टा/प्रतिनिधी:चिमूर

-चीमुर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या नवतळा येथील विकास जेंगटे यांच्या घराला काल रात्री आग लागली आगीने रौद्र रूप धरताच धुर मोट्या प्रमाणात निघाल्या मूळे घरातील लोकांना व गावकर्यांना माहिती झाली सर्वजण आग विजवण्यासाठी धावाधाव करीत होते यात घर जळून खाक झाले आणि घरामध्ये ठेवलेल्या साऊंड सर्व्हिस संपुर्ण जळून खाक झाले यात लाखो रुपयांचे नुकसान झाले .

नवतळा येथील विकास जेंगटे यांच्या घराला अचानक आग लागली हळूहळू आगीने रौद्र रूप धारण केल्यानेआणि मोट्या प्रमाणात धूर निघाल्यामुळे लोकांच्या लक्षात आग लागल्याचे समजले जो तो आग विजवण्यासाठी धाऊ लागला आग इतकी भयंकर होती की घरात ठेवलेला साऊंड सिस्टम पूर्ण जळून खाक झाला परंतु कुठलीही जीवित हानी झाली नाही. कारण घरातील सदस्य हे बाजूच्या रूम मध्ये होते आग लागल्याची समजताच सर्वजण बाहेर आले व आग विझवू लागले यात संपूर्ण घर जाळले असून अन्न धान्य व इतर सर्व सामान जळून खाक झाले 3 लाखाचे साऊंड सिस्टम जळून राख झाले मात्र आग कशाने लागली याचे कारण कळू शाळे नाही त्यामुळे सदर व्यक्तीला शासनाने आर्थिक मदत करावे अशी मागणी होत आहे.