ब्रेकिंग : बल्लारपूरात मर्डर : मृतक - सुनील सिमलवार : पोलीस तपास सुरु#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : बल्लारपूरात मर्डर : मृतक - सुनील सिमलवार : पोलीस तपास सुरु#chandrapur

Share This

ब्रेकिंग : बल्लारपूरात मर्डर : मृतक - सुनील सिमलवार : पोलीस तपास सुरु,

खबरकट्टा / चंद्रपूर : 

बल्लारपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत्या क्रमांकावर आहे. काल दिनांक 19 नोव्हेंबर ला शहरातील चंद्रपूर स्लज गार्डन च्या समोर नाग मंदिर परिसरातील(पुराना धोबीघाट) एका झोपडीत सुनील सिमलवार वय - 27 वर्ष रा. महाराणा प्रताप वॉर्ड, बल्लारपूर यांचा खून झाल्याची घटना घडली आहे. शहरात काल सायंकाळी 8:00 वाजताच्या सुमारास सदर घटनाकृत्य आपसी मतभेदांमुळे घडल्याची माहिती असून मृतकाच्या चेहऱ्यावर मार असल्याचे प्रत्यक्षदर्शीच्या माहिती आहे.

बल्लारपूर शहरात वाढत्या गुन्हेगारी मुळे पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहे तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस करीत आहे.

*****************((((()))))*****************