एस. पी चंद्रपूर या नावाने पोलीसाची बनावट आयडी तयार करून फसवणुकीचा प्रयत्न#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एस. पी चंद्रपूर या नावाने पोलीसाची बनावट आयडी तयार करून फसवणुकीचा प्रयत्न#chandrapur

Share Thisएस. पी चंद्रपूर या नावाने पोलीसाची बनावट आयडी तयार करून फसवणुकीचा प्रयत्न,

खबरकट्टा/प्रतिनिधी:चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हा पोलिसाची अधिकृत फेसबुक आयडी "एसीपी चंद्रपूर" वरील प्रोफाइल आणि फोटोची काफी करून त्याच प्रकारे दिसणारी नवीन बनावट/ खोटी फेसबुक आयडी तयार करून फेसबुक मधील फेसबुक मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना आर्थिक अडचणी ची बहाणा करून पैशाची मागणी करून गुगल पे, फोन पे द्वारे पैसे पाठवण्याची पैसे पाठवण्यास विनंती करीत असल्याचे निदर्शनास आल्याने यासंबंधीची पोलीस ठाणे रामनगर येथे अज्ञात इस्मा विरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात येऊन तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे साहेब यांनी दिली आहे.

कोरोना १९ चा काळात सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे सोशल मीडिया चे बनावट प्रोफाइल तयार करून मेसेज तयार करून पैशाची व्हाट्सअप चॅटिंग, ब्लॅकमेलिंग, ऑनलाइन वाँलेटची, क्रेडिट कार्ड केवायसी, नोकरीचे आमिष दाखवून सामान्य लोकांची फसवणूक केली जात आहे.

बरेचदा जेष्ठ नागरिक, लाँक डाऊन मुळे अनेक लोक अनेक लोकांच्या गमवण्यात आले आहे. त्यांचे पैसे काढून देण्याचे आम्ही दाखवून त्यांना बसवल्या जात आहे.सोशल मीडियावर आलेल्या बातम्या फेसबुक आयडी व्हाट्सअप यांना खात्री केल्याशिवाय स्वीकारू नये.

मुला मुलींचे मीडियावर फोटो टाकताना काळजी घ्यावे. वैयक्तिक संवेदनशील माहिती कुणालाही शेअर करू नये.

जिल्हा पोलीस विभागाकडून वारंवार होत असलेल्या माहिती संदर्भात आपण गंभीर याने पाळावेपाडावे.

पोलीस विभागाकडून सायबर आठवडा सुरू करण्यात आलेला आहे. त्यासंबंधाची सायबर गुन्ह्यात फसवणूक झाल्यास जवळील पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्याचे कळविण्यात आले आहे.