राजुरा काँग्रेस ला ऐन दिवाळीत खिंडार#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा काँग्रेस ला ऐन दिवाळीत खिंडार#chandrapur

Share Thisराजुरा काँग्रेस ला ऐन दिवाळीत खिंडार,,,,

खबरकट्टा/प्रतिनिधी

राजुरा पंचायत समिती सभापतीचे कुटुंब काँग्रेस सोडण्याच्या तयारीत : सत्ता ही नशा आहे म्हणतात या नशेचे व्यसन कोणत्या थराला जाईल हे कोणत्याही राजकीय भाष्यकाराच्या भाष्यांना नेहमीच हुलकावणी देणार ठरतं. 


सत्ता आली की इनकमिंग चा ओघ हे सत्तेच्या नशेची हाव असते व एरव्ही तशी फॅशनही आहे. परंतु, राजुरा विधानसभा क्षेत्रात सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांमध्ये का खळबळ असावी हे कळायला मार्ग नाही. याची अनेक जिवंत उदाहरणे चर्चेत असतानाच राजुरा पंचायत समितीच्या सभापतींचे कुटुंब गोंडवाना गणतंत्र पार्टीत येत्या 1 ते 2 दिवसात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी होकारार्थी कळविले आहे. 


तसें हे कुटुंब गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस चे परमनन्ट कॅडेर मानल्या जातात शिवाय राजुरा विधानसभेच्या काही क्षेत्रात पंचायत राज व स्थानिक निवडणुकांमध्ये या कुटुंबाचे गेल्या तीन दशकांपासून वजनही आहे व अनेक यापूर्वीही अनेक वेळा पंचायत समिती, जिल्हापरीषदेचे नेतृत्व ही केलेले आहे. 


मागचे 5 वर्ष राज्यात काँग्रेसची सत्ता नसताना व राजुरा विधानसभेतही काँग्रेस चे आमदार घरीच बसून असतानाही कार्यकर्त्यांची समर्पकता बघायला मिळाली होती. आता मात्र सत्ता व नेतृत्व दोन्ही असताना काँग्रेस ला पडत असलेली ही खिंडार भविष्यातील समीकरण बिघडविणारी ठरू शकते.